जळगाव : प्रतिनीधी आयुष्यात एखादे ध्येय गाठायचे असेल तर आवडीचे क्षेत्र निवडा आणि त्याचा सातत्याने पाठलाग करा परंतु ते करत असतांना आयुष्यातील आनंदही अनुभवावा असे प्रतिपादन जी. एच रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाच्या २०१८ बॅचचे माजी विद्यार्थी असलेले भाग्येश त्रिपाठी यांनी केले. यावेळी त्यांनी विदयार्थींशी संवाद साधताना आयुष्यात छंद ही जोपासण्याचा सल्ला दिला. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “माजी विद्यार्थी संवाद” या कार्यक्रमाअंतर्गत भाग्येश त्रिपाठी हे कॉम्प्यूटर अॅप्लिकेशन विभागाच्या विध्यार्थ्यांशी बोलत होते. श्री. त्रिपाठी हे सध्या मुंबई येथील वेअरसिटीज या कंपनीत सायबर सेक्युरिटी अॅनालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. सायबर सेक्युरिटी अॅनालिस्ट या क्षेत्रातील विविध संधी, त्यांची…
Author: Saimat
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगावातून रेल्वेने सुरत येथून मुंबई जाण्यासाठी निघालेला १४ वर्षीय मुलगा चुकीने हिस्सार सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये बसला. गाडी मुंबई येथे जात नसल्याची माहिती त्याला काही लोकांनी दिली. त्यामुळे हा मुलगा १ अाॅगस्ट राेजी जळगाव स्थानकावर उतरला. दरम्यान, भेदरलेल्या अवस्थेत प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर तो फिरत होता. यावेळी सिद्धार्थ वाघ या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने मुलाची विचारपूस केली. त्यानंतर वाघ यांनी मुलाच्या वडिलांना संपर्क साधून पालकांच्या स्वाधीन केले. अहमद अलीम अन्सारी (वय १४, रा. बोरिवली ईस्ट, मुंबई) असे या मुलाचे नाव आहे. अहमद हा २७ जुलै रोजी सुरत येथे आजीकडे गेला होता. १ ऑगस्ट रोजी तो पुन्हा मुंबईला येण्यासाठी निघाला.…
यावल : प्रतिनिधी शाळांमधील शालेय पोषण आहाराचे गेल्या पाच वर्षाचे ऑडिट करण्याचे निर्दश शासनाने दिले आहे मात्र या कामास खाजगी व जिल्हा परिषद शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर महासंघ शाखा यावल यांच्यातर्फे सुद्धा विरोध नोंदविण्यात आला. महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर महासंघ यावल शाखा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाळांमधील शालेय पोषण आहाराचे गेल्या पाच वर्षाच्या ऑडिट करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे मात्र या कामास खाजगी व जिल्हा परिषद शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. या कामामुळे अध्यापनाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे.यामुळे या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी खाजगी प्राथमिक…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी प्रत्येक गावातील पोलीस पाटील हे पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून आतापर्यंत ओळखले जात होते आणि आहे,परंतु आता प्रत्येक ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच यांनी आप-आपल्या गावात ठराविक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास सुरू असलेल्या घटनांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंध लावता येईल अशा सूचना वजा नम्रपणे आवाहन पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पोलीस पाटील सरपंच उपसरपंच यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत केल्याने पोलिसांचा आता चौथा डोळा सक्रिय होणार गुन्ह्यांच्या कामात तात्काळ चौकशी तपास केला जाऊन गुन्हेगार तात्काळ पकडले जाणार असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरा मुळे एखादी गावात ठराविक ठिकाणी घटना घडल्यास आरोपीचा गुन्हेगाराचा शोध लावण्याकामी मोठा पुरावा आपल्या हाती लागेल.आतापर्यंत पोलिसांना प्रत्येक…
जळगाव: महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते कवी मिथुन गौतम ढिवरे यांच्या ‘हरवलेला काळ’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन आयुक्त सभागृहामध्ये आज करण्यात आले. प्रकाशनाच्या वेळी “नवोदित कवी आणि लेखक यांनी उत्कृष्ट साहित्य निर्मिती करून समाजाची सेवा करावी” अशा भावना आयुक्त मॅडम यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलेंद्र जाधव होते. अध्यक्षीय भाषणामध्ये शैलेंद्र जाधव यांनी ‘हरवलेला काळ’ या काव्यसंग्रहाबद्दल सविस्तर विवेचन केले आणि ‘हरवलेला काळ’ यामध्ये असलेल्या कविता आजच्या काळाला किती तंतोतंत लागू पडतात याबद्दल सांगितले. कार्यक्रमाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये काव्यसंग्रहाला प्रस्तावना देणारे आणि शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे खिरोदा बी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. साहेबराव त्र्यंबकराव भुकन यांचा विशेष सत्कार आयुक्त विद्या…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी ओबीसींना आरक्षण देण्यात शिवसेनेकडून वारंवार टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. शिवसेना सत्तेत असताना शिवसेनेला ओबीसींना आरक्षण देता आलं नाही, असाही शिवसेनेवर आरोप होत आहे. मात्र, आता लक्ष्मण हाके यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेवरील हे आरोप सेनेला खोडता येणार आहेत. पुणे : शिवसेनेत आमदार आणि खासदारांनी बंडाळी केल्यानंतर शिवसेनेचं (shivsena) काय होणार? असा सवाल केला जात होता. मात्र, इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्याच आठवड्यात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना उपनेतेपद देण्यात…
मेष- नात्यांवर विश्वास ठेवा. आज बिघडलेली नातीही मार्गी लागणार आहेत. कोणा एका व्यक्तीची खास मदत होणार आहे. वृषभ- अफवांवर विश्वास ठेवू नका. नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवा. तुमच्या बुद्धिमत्तेची परीक्षा आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. मिथुन- काही खास गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याची तुमची क्षमता वाढेल. भावनात्मक निर्णय घेण्यामध्ये घाई करू नका. वेळेला महत्त्व द्या. कर्क- सामाजिक कामांमध्ये आज तुमचा सहभाग वाढेल. सावध राहा. सर्व क्षेत्रांमध्ये आज तुमचा बोलबाला असेल. काही क्षणी मात्र सावध राहा. सिंह- कुटुंबात सुखशांती नांदेल. इतरांशी विनम्रतेनं वागा. आरोग्याची काळजी घ्या. कन्या- आज तुमच्याप्रती इतरांच्या मनात असणारी आदराची भावना वाढेल. व्यवसायात लक्ष द्या नफा होणार आहे. सर्वांना सोबत घेऊन…
साईमत लाईव्ह जळगांव प्रतिनिधी मराठा सेवा संघाच्या संभाजी बिग्रेडच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा सेवा संघाच्या संभाजी बिग्रेडच्या माध्यमातून समाजात सदैव कार्यरत असलेले तुषार सावंत यांच्या कार्याची दखल घेवून प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड व प्रदेश महासचिव सुभाष बोरकर यांच्या आदेशाने तुषार सावंत यांची मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्तपत्र त्यांना नुकतेच देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांच्यावर मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांसह समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जळगाव : प्रतिनिधी मराठा सेवा संघाच्या संभाजी बिग्रेडच्या जळगाव महानगराध्यक्षपदी संदीप पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा सेवा संघाच्या संभाजी बिग्रेडच्या माध्यमातून समाजात सदैव कार्यरत असलेले संदीप पाटील यांच्या कार्याची दखल घेवून प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड व प्रदेश महासचिव सुभाष बोरकर यांच्या आदेशाने संदीप पाटील यांची मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या जळगाव महानगराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्तपत्र त्यांना नुकतेच देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांच्यावर मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांसह समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील निंबादेवी, मनुदेवी यावल, पाटणादेवी चाळीसगाव येथे अचानक झालेल्या गर्दीमुळे सुरक्षेचे कारण देत जिल्हाधिकार्यांनी जमावबंदीचे आदेश देत जवळपास सर्वच पर्यटन स्थळांवर बंदी लावली आहे. सदरची बंदी लवकरात लवकर हटवून नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे जळगाव महानगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, निंबादेवी यावल, मनुदेवी यावल, पाटणादेवी चाळीसगाव येथे झालेल्या गर्दीमुळे तसेच जिवीत हानीचा विचार करता जिल्हाधिकार्यांनी जमावबंदीचा आदेश दिला होता. तो निर्णय त्यावेळी योग्यही होता मात्र आता मनसेकडे ही बंदी उठवावी म्हणून नागरीकांनी निवेदन दिले आहे त्या आधारे आम्ही जिल्हाधिकार्यांना नागरीकांच्या वतीने विनंती करतो आहे की, जिल्ह्यातील नागरीकांना…