भरकटलेल्या मुलाला केला त्यांच्या परिवाराला स्वाधीन

0
19

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
जळगावातून रेल्वेने सुरत येथून मुंबई जाण्यासाठी निघालेला १४ वर्षीय मुलगा चुकीने हिस्सार सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये बसला. गाडी मुंबई येथे जात नसल्याची माहिती त्याला काही लोकांनी दिली. त्यामुळे हा मुलगा १ अाॅगस्ट राेजी जळगाव स्थानकावर उतरला. दरम्यान, भेदरलेल्या अवस्थेत प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर तो फिरत होता. यावेळी सिद्धार्थ वाघ या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने मुलाची विचारपूस केली. त्यानंतर वाघ यांनी मुलाच्या वडिलांना संपर्क साधून पालकांच्या स्वाधीन केले.

अहमद अलीम अन्सारी (वय १४, रा. बोरिवली ईस्ट, मुंबई) असे या मुलाचे नाव आहे. अहमद हा २७ जुलै रोजी सुरत येथे आजीकडे गेला होता. १ ऑगस्ट रोजी तो पुन्हा मुंबईला येण्यासाठी निघाला. यावेळी तो चुकीच्या रेल्वेगाडीत बसल्यामुळे मुंबई ऐवजी जळगावला पोहोचला. स्थानकावर उतरल्यानंतर ताे भरकटला होता. यावेळी वाघ यांनी सतर्कता दाखवत अहमदला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्या वडीलांना फोन करुन अहमद सुरक्षित असल्याची माहिती दिली. यानंतर संस्कार ऊर्जा सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या सपना श्रीवास्तव यांच्या ताब्यात अहमद याला दिले. २ रोजी पालकांनी जळगावात येऊन अहमदला ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here