धुळे हादरलं! तरुणावर गोळीबार ; दोघा संशयितांना अटक

0
11

साईमत लाईव्ह धुळे प्रतिनिधी

धुळे शहर तरुणाच्या हत्येनं हादरलं आहे. धुळे शहरातली कुमार नगर परिसरात गोळीबार करत तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या गोळीबारामध्ये चिनू उर्फ चंद्र राजेंद्र पोपली हा तरुण ठार झाला आहे. आर्थिक देवाणघेवाणी ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. या हत्येमुळे एकच खळबळ धुळे शहरात पसरली आहे. मध्यरात्री ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबार प्रकरणी धुळे पोलिसांनीही दोघांवर कारवाई केलीय. दोघा संशयितांना पोलिसांनी (Dhule Police) ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी धुळे पोलीस करत आहेत. मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण परिसरात दहशत पसरली आहे. संशयित आरोपींच्या चौकशीतून आता नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचंय.
नेमकं काय घडलंं?
शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेनंतर आता पोलिसांकडून हत्याप्रकरणाचा कसून तपास केला जातो आहे. पैशांच्या वादातून ही हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. पवन नावाच्या व्यक्तीने या हत्येबाबत माहिती दिली आहे.

वहिनींसोबत तिघांनी अभद्र भाषेत बाचतीत केली होती. चिनूवर हल्ला करण्याआधी तिघे हल्लेघोर घरी गेले होते. आम्ही सगळे चौकत येऊन बसलो होतो.त्यावेळी तिघांनी येऊन हल्ला केला. त्याआधी तिघांनी तरुणाच्या घरावरही धडक दिल्याचं कळतं. तिथं काही सापडलं नाही म्हणून तिघा हल्लेखोरांनी येऊन विचारणा केली, असं पवन या तरुणानं म्हटलंय.
आधी बाचाबाची झाली. मग मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर देसी कट्टा काढला आणि गोळी झाडून चिनूचा खून केला. या नंतर जखमी झालेल्या चिनूला घेऊन आम्ही सिव्हिल रुग्णालयात गेलो. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं, अशी माहिती पवनने दिलीये.

आधी बाचाबाची झाली. मग मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर देसी कट्टा काढला आणि गोळी झाडून चिनूचा खून केला. या नंतर जखमी झालेल्या चिनूला घेऊन आम्ही सिव्हिल रुग्णालयात गेलो. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं, अशी माहिती पवनने दिलीये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here