साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी
सध्या राज्याच्याराजकारणात बरेच बदल होत आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आदित्य ठाकरे अधिक आक्रमक झाल्याचं दिसतंय. ते अधिक ठामपणे शिवसेनेची बाजू मांडताना दिसत आहेत. ते सध्या दौरा करत आहेत. पक्षातील नेत्यांशी, सर्वसामान्य लोकांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. अश्यातच त्यांचे बंधू आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी त्यांच्या या दौऱ्यावर टीका केली आहे. अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या रॅलीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “शिवसेनेत बंड होण्याआधी मी माझे दौरे सुरू केलेत. पण माझा आदित्य ठाकरेंना प्रश्न आहे. जर एकनाथ शिंदे यांचं बंड झालं नसतं तर तुम्ही दौरा केला असता का, एवढाच माझा एक प्रश्न आहे”, असं अमित ठाकरे म्हणालेत.