साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी सातपुड्यात सागवानी वृक्षतोड करून वनविभागात शेतीसाठी जागा ताब्यात घेण्याचा सपाटा यावल वन विभाग कार्यक्षेत्रात सुरू झाला आहे. सातपुड्यातील वृक्षतोड करून शेतीसाठी जागा तयार करण्याची मोहीम मध्य प्रदेशातील 100 ते 200 आदिवासी बांधवांनी महाराष्ट्रात यावल वन विभागात सुरू केली आहे. हे आदिवासी सातपुड्याला लागून असलेल्या खाजगी मालकांच्या शेतात भाडेतत्त्वावर रहिवास करून सोयीनुसार आणि वेळेनुसार सातपुडा जंगलातील सागवानी वृक्ष व इतर मौल्यवान वृक्षाची कत्तल करून सातपुड्यात शेतीसाठी अतिक्रमण करीत आहेत. दि.17 ऑगस्ट 2022 च्या रात्री वन कर्मचारी सातपुडा भागात गस्तीसाठी किंवा पाहणीसाठी गेले असता वन कर्मचाऱ्यांवर सातपुड्यात दगडफेक करण्यात आल्याचे तसेच दगडफेक करणारे सातपुड्यात फरार झाल्याचे यावल तालुक्यात…
Author: Saimat
साईमत लाईव्ह साकेगाव प्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य सचिन सपकाळे यांच्या माध्यमातून गुरांच्या आरोग्याचे आरोग्याचे शिबिर संपन्न झाले.साकेगाव गावात नुकतेच लंपी या गुरांच्या आजाराने थैमान घातले होते. यासाठी गुरे दगावण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी एक पत्रक काढले होते. या पत्रकाच्या अनुषंगाने ग्रा.प.सदस्य सचिन सपकाळे,शकील पटेल व ग्रामस्थ संतोष पाटील व ग्रामविकास अधिकारी शिरतुरे यांच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून गावात 500 गुरांना 13 ऑगस्ट रोजी व्हॅक्सिन लस मारण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी गावातील पशु मालकांनी गुरांच्या आरोग्यासाठी आपल्या गुरांवर वॅक्सिंग मारून घेतल्या, त्यामुळे गुरांच्या आजाराचे प्रमाण कमी झाले असून तसेच ज्यांची गुरे या…
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी येथील तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील चिखली – शेवगे बुद्रुक ग्रामसेवक यांचेवर कारवाईसाठी एक उपोषण तर नांदगाव येथील. घरकुल लाभार्थी यांचे निधी खात्यात आश्वासन देऊन सुद्धा वर्ग न झाल्याने दुसरे उपोषण सुरु आहे. 30/09/2022 रोजी ग्रा. पं. अधिकारी (ग्रा.प) यांच्या कडे आम्ही दिलेला तक्रारी अर्ज दि. 08/10/2021 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कडून तक्रारी अर्ज जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे पाठवण्यात आला. तसेच जिल्हापरिषदेकडून तो अर्ज दि. 20/10/2021 रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांच्याकडे पाठवून संबंधित अर्जाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा असे आदेश असतांना सुध्दा गट विकास अधिकारी यांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या 1 ते 14 मुध्ये चौकशी…
गोंदिया : वृत्तसंस्था बिलासपूरहून राजस्थानमधील भगत की कोठीकडे जाणाऱ्या ‘भगत की कोठी’ एक्सप्रेसचा गोंदिया शहराजवळ मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली. मालगाडी आणि ‘भगत की कोठी’ एक्सप्रेस यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. या अपघातानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळाखाली घसरला असून ५० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींवर गोंदियातील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भगत की, कोठी एक्सप्रेस छत्तीसगडच्या बिलासपूरहून राजस्थानमधील भगत की कोठीकडे जात होती. गोंदिया स्थानकाजवळ ही गाडी आली असता सिग्नल न मिळाल्यामुळे समोरुन येणाऱ्या मालगाडीवर ही एक्सप्रेस आदळली. या अपघातानंतर एक्सप्रेस एस-३ डबा रुळावरून घसरला. या…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहरातील वर्दळीच्या सिव्हिल हाॅस्पिटल समाेरील रस्त्यावर दाेन वर्षांपासून जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात तर या ठिकाणी जलसंधारण अभियान आपसूक राबवले जातेय की काय असे चित्र समाेर आले. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ‘आप’ने दाेन दिवसांपूर्वी खड्ड्याला पुष्पहार अर्पण करून राेष व्यक्त केला हाेता. त्यानंतर महापालिकेला जाग आली आणि मंगळवारपासून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सिव्हिल हाॅस्पिटलसमाेर पुष्पलता बेंडाळे चाैक ते पांडे चाैक असा हा रस्ता आहे. इच्छादेवी चाैफुली, सिंधी काॅलनीकडून बाजारपेठेत येण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. हजाराे वाहने राेज या मार्गाने ये-जा करतात. मात्र, या रस्त्यावर खड्डे इतके आहेत की महिनाभरापूर्वी या रस्त्यावर दाेन गर्भवती महिलांची…
साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील जि प उर्दू शाळेत भारतीय स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा झाला गावातील मुस्लिम पंच कमिटीचे सदस्य व जेष्ठ नागरिक शौकत पिंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंचपती दिनेश पाटील शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष नाज़िम मन्यार, खलील मन्यार, सत्तार बागबान, हाजी शफीयोद्दीन, मौलाना सफ्फार, हाजी शफी मन्यार , इस्हाक शाह, अमजद शाह, अश्फाक शाह, ज़ाकिर पिंजारी,जलील मन्यार,इम्रान मन्यार,रियाज खाटिक,मंजूर सय्यद,अरमान भाई, साबिर गनी मन्यार, फरीद बेलदार, समीर बागबान,नूरकलाम बागवान ,नजमोद्दीन साहब, जुनैद तंबोली, हारून मन्यार, शिक्षक तनवीर शाह, खलील शेख, तबस्सुम बेगम,नवीदा शेख , व गावातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थीचे पालक व…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे ७५ आझादीचा अमृत महोत्सव दिमाखात पार पडला… ग्रामपंचायत कार्यालय बनोटी मार्फत विविध कार्यक्रम ची आखणी करण्यात आली तसेच सर्व शिक्षक कर्मचारी अंगणवाडी सेविका व सर्व तरुण उत्सुक मित्र मंडळ यांच्या सहकार्याने तालुक्यातील सर्वात सूंदर कार्यक्रम घडून आला….!! ◆ हर घर तिरंगा ◆ भारतीय सैन्य मध्ये कार्यरत असलेल्या तरुणांच्या पालकांना सन्मानित करण्यात आले. ◆ अतिशय सुंदर व सुसज्ज असे कार्यालय सजावट करण्यात आली. ◆ वाद्य लावून ग्रामपंचायत समोर सामूहिक राष्ट्रगाणं व ध्वजारोहण झाले. ◆ जी. प. प्रशाळा बनोटी च्या विद्यार्थीनी नि अतिशय सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम घेतला. ◆तसेच गावातील मित्र मंडळ तरुणांनी मिठाई…
जळगांव प्रतिनिधी डांभुर्णी येथील प्रगतिशिल शेतकरी श्री सोनू गोमा भंगाळे यांच्या पत्नी व श्री राजेंद्र सोनू भंगाळे यांच्या मातोश्री सौ. जनाबाई सोनू भंगाळे यांचे वृद्धापकाळाने दि १६.०८. 2022 मंगळवार रोजी सकाळी ९.०० वाजता निधन झाले. त्याची अंतिमयात्रा १७-०८-२०२२ रोजी सकाळी 10.00 वाजता राहत्या घरून कोल्हे नगर, जळगांव येथून निघेल व त्यांचे अंतिम संस्कार वैकुंठधाम, नेरी नाका येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात, पती, १ मुलगा, सुन, 2 मुलि, व जावई, नातू ,नातसून, नात: असा परिवार आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये ITBP अर्थात इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या ३७ जवानांना घेऊन जाणाऱ्या एका बसला अपघात झाला आहे. ही बस चंदनवारी भागातून पहलगामच्या दिशेने येत होती. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बसमध्ये एकूण ३९ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ३७ आयटीबीपीचे जवान होते. या दुर्घटनेत ६ जवान शहीद झाले आहेत. अमरनाथ यात्रेच्या ड्युटीवरून हे सगळे जवान पहलगामच्या दिशेने येत होते. एका बसमध्ये ३७ जवान प्रवास करत होते. त्यांच्यासोबत २ रहिवासी देखील होते. पहलगाममध्ये बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे ही बस नदीपात्रात कोसळली. या भीषण दुर्घटनेमध्ये आयटीबीपीचे ६ जवान शहीद झाले आहेत. त्यांच्यासोबत इतरही…