मध्य प्रदेशातील 100 ते 150 आदिवासी झाले यावल तालुक्याचे रहिवाशी

0
2

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी 
सातपुड्यात सागवानी वृक्षतोड करून वनविभागात शेतीसाठी जागा ताब्यात घेण्याचा सपाटा यावल वन विभाग कार्यक्षेत्रात सुरू झाला आहे. सातपुड्यातील वृक्षतोड करून शेतीसाठी जागा तयार करण्याची मोहीम मध्य प्रदेशातील 100 ते 200 आदिवासी बांधवांनी महाराष्ट्रात यावल वन विभागात सुरू केली आहे. हे आदिवासी सातपुड्याला लागून असलेल्या खाजगी मालकांच्या शेतात भाडेतत्त्वावर रहिवास करून सोयीनुसार आणि वेळेनुसार सातपुडा जंगलातील सागवानी वृक्ष व इतर मौल्यवान वृक्षाची कत्तल करून सातपुड्यात शेतीसाठी अतिक्रमण करीत आहेत.

दि.17 ऑगस्ट 2022 च्या रात्री वन कर्मचारी सातपुडा भागात गस्तीसाठी किंवा पाहणीसाठी गेले असता वन कर्मचाऱ्यांवर सातपुड्यात दगडफेक करण्यात आल्याचे तसेच दगडफेक करणारे सातपुड्यात फरार झाल्याचे यावल तालुक्यात डोंगर कठोरा परिसरात बोलले जात आहे. याबाबत मात्र यावल वन विभागातून कोणतेही माहिती प्रसिद्ध केली जात नसल्याने सुद्धा तालुक्यातील जनतेमध्ये वन विभागाच्या कामकाजाबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.
सातपुड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यावल वन विभागाचे मुख्य कार्यालय जळगाव येथे असून जळगावपासून 60 किलोमीटर अंतरावर आणि यावल येथील पूर्वपश्चिम वनक्षेत्र कार्यालयापासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर डोंगरकठोरापासून डोंगरदा परिसरात शेत गट नंबर 1655 ला लागून असलेल्या सातपुडा जंगलात सागवानी वृक्षाची तोड करून त्या ठिकाणी शेत जमिनी तयार करण्याचा सपाटा मध्य प्रदेशातील आदिवासींनी सुरू केला. वन विभागाकडून यांची धरपकडसुद्धा गेल्या आठ दिवसापासून सुरू असून संबंधितांवर नेमकी काय कार्यवाही झाली याची माहिती वन विभागाकडून मिळत नसल्याने सातपुड्यात ‘जंगल मे मंगल’ असल्याचे संपूर्ण डोंगरकठोरा परिसरात बोलले जात आहे.
या आदिवासींनी काही खाजगी शेतमालकांकडून रहिवासासाठी जागा भाडेतत्त्वाने घेऊन सातपुडा जंगलात ते आपल्या सोयीनुसार वृक्षतोड करून शेतीसाठी शेतजमीन तयार करीत आहेत या आदिवासींनी काही राज्यकारण्यांना हाताशी धरून यावल तालुक्यात रहिवासासाठी संपूर्ण नोंदी केल्या असून आधार कार्ड सुद्धा मिळविल्याचे बोलले जात आहे याकडे वन विभाग अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सुद्धा डोंगर कठोरा परिसरातून होत आहे तरी याकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वनप्रेमी संघटनांनी तातडीने लक्ष केंद्रित करून तोच निर्णय घेऊन सातपुडा जंगल वाचविण्यासाठी प्रयत्न करावे असे सर्व स्तरातून बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here