कजगाव उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिवस साजरा

0
34

साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी

कजगाव ता भडगाव येथील जि प उर्दू शाळेत भारतीय स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा झाला गावातील मुस्लिम पंच कमिटीचे सदस्य व जेष्ठ नागरिक शौकत पिंजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी सरपंचपती दिनेश पाटील शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष नाज़िम मन्यार, खलील मन्यार, सत्तार बागबान, हाजी शफीयोद्दीन, मौलाना सफ्फार, हाजी शफी मन्यार , इस्हाक शाह, अमजद शाह, अश्फाक शाह, ज़ाकिर पिंजारी,जलील मन्यार,इम्रान मन्यार,रियाज खाटिक,मंजूर सय्यद,अरमान भाई, साबिर गनी मन्यार, फरीद बेलदार, समीर बागबान,नूरकलाम बागवान ,नजमोद्दीन साहब, जुनैद तंबोली, हारून मन्यार, शिक्षक तनवीर शाह, खलील शेख, तबस्सुम बेगम,नवीदा शेख , व गावातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थीचे पालक व असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव निमित्ताने दोन आठवड्या पासून विविध कार्यक्रम व उपक्रम राबवण्यात आले त्यात तिरंगा रैली, चित्रकला स्पर्धा, खेडांची स्पर्धा, गायन स्पर्धा, वक्तव्य स्पर्धा, देश भक्तीपर गीत व विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here