साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी राज्यात मुलींची छेड काढण्याचं प्रमाण अधिक आहे. अशा प्रकरणामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर अनेक आरोपींना पोलिसांनी शिक्षा दिली आहे. परंतु तरीही अशी प्रकरण उघडकीस येत आहेत. मुंबईतल्या घाटकोपरमधील कामराजनगरमध्ये एका रोड रोमिओला रहिवाशांनी मारहाण केली आहे. एका 12 वर्षाच्या मुलीची छेड काढत असताना तिथं असलेल्या नागरिकांनी त्याचा चांगला चोप दिल्याची माहिती समजली आहे. ज्याला नागरिकांनी मारहाण केली, तो शाळेत जात असलेल्या मुलींना मारहाण करीत असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यावेळी आरोपी कृत्य करित होता. त्यावेळी त्याला मारहाण करुन नागरिकांनी त्यांची अर्धनग्न अवस्थेत वरात काढली. अर्धनग्न अवस्थेत वरात देखील काढण्यात आली मागच्या काही दिवसांपासून एक रोड रोमियो शाळेत जात…
Author: Saimat
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी माजी पर्यावरण मंत्री तथा युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेनिमित्त आज जळगावात पोहचले. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर फाडल्यावरून आदित्य ठाकरेंनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना मोजक्या शब्दात बंडखोरांना इशारा दिला. ते म्हणाले की,गद्दार हे गद्दारच असतात मी आज गद्दारांचा मुखवटा काढण्यासाठी आलो आहे, जनतेचे आशीर्वाद घ्यायला आलो असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदित्य ठाकरे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी जळगाव विमानतळावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्यात ठिकठिकाणी जाऊन पक्षाची भूमिका मांडत आहेत. निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद या नावाने त्यांच्या यात्रा सुरू आहेत.…
साईमत लाईव्ह अहमदनगर प्रतिनिधी कोपरगाव शहरामध्ये दोन दिवसांपूर्वी चौकात दहिहंडी स्वागत कमान उभारणीवरून वाद निर्माण झाला होता. या वादात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत मोठा राडा झाला होता. यामध्येच आता शिर्डीतील साईबाबा संस्थानाचे अध्यक्ष तसेच कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी भाजपचे नेते व कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या शेवटी आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांना टोलादेखील लगावला आहे. ते म्हणाले की, आमच्या नादाला लागाल तर ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. काही लोकांना वाटतेय सरकार बदलले आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढलेला आहे; परंतु आमदार बदललेला नाही आमदार मीच आहे, असा टोला त्यांनी भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना यावेळी लगावला आहे.…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईमध्ये (Mumbai) पुन्हा एकदा हल्ला (Attack) होणार असल्याची धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोल रूमला (Traffic control room) धमकीचा मेसेज (threatening message)आला आहे. ऐन सणासुदीच्या काळातच हा मेसेज आल्यानं मुंबई पोलिसांची चिंता वाढली आहे. मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आल्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा मुंबईत बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुममधील व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये 6 दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच लवकरच मुंबईत 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली आहे.…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी : शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे आज (२० ऑगस्ट) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांचा हा दौरा सुरू होण्यापूर्वीच जळगावात शिंदे-ठाकरे गट व समर्थक आमने-सामने आले आहेत. अशातच मध्यरात्री धरणगावात प्रवेश मार्गावरील आदित्य ठाकरे यांचे स्वागताचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे गावात आता तणावाचे वातावरण निर्माण झालले आहे. माहितीनुसार, सहा ते सात ठिकाणी आदित्य ठाकरेंचे स्वागताचे बॅनर फाडण्यात आले. द्वेष भावनेतून हे काम करण्यात आले असा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. आदित्य यांची ‘शिवसंवाद यात्रा’ आज जळगाव जिल्ह्यात येत आहे. या यात्रेचा दौरा…
साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी (विजय चौधरी) येथील शासकीय कार्यालय दररोज उघडले जाते… बंदही केले जाते… या कार्यालयामार्फत तालुक्यात कोटींच्या घरात खर्च असलेली कामेही कागदावर दिसताहेत; मात्र अनेक महिन्यांपासून बहुतांश कार्यलयातील अधिकारी केवळ आठवड्यातुन एकच दिवस हजेरी लावतात. त्यामुळे कोणत्याच नियंत्रणाविना चालणाऱ्या यंत्रणाला येथे आठवडी ‘कार्यालय” म्हटले जाते. सोयगाव शहरात एकूण २३ विविध यंत्रणांचे शासकीय कार्यालये आहेत. यामध्ये, तहसील कार्यलय, पोलीस ठाणे, पंचायत समिती, नगर पंचायत, लागवड अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पशुसंवर्धन चिकित्सालय, ग्रामीण रुग्णालय, बांधकाम उपविभाग(फरदापुर), एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी, जिल्हा परिषद सिंचन, जिल्हा परिषद बांधकाम, उपअधीक्षक भूमी अभिलेख,दुय्यम निबंधक, लघु पाटबंधारे स्थानिक स्तर, महावितरण कंपनी क्र.…
साईमत लाईव्ह प्रतिनिधी ठाणे Thane News : अपघातात ट्रकचालक/मालक दिनेश सोलकर (४०) हे अपघातग्रस्त ट्रकमध्येच अडकले होते. त्यांच्या नाकाला, चेहऱ्याला व पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ठाणे – ठाण्याकडून भिवंडी, पडघा येथे जात असताना समोर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रकने जोरदार मागून धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास कॅडबरी कंपनीजवळ घडली. या अपघातात ट्रकचालक/मालक दिनेश सोलकर (४०) हे अपघातग्रस्त ट्रकमध्येच अडकले होते. त्यांच्या नाकाला, चेहऱ्याला व पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करून रस्ता मोकळा केल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षेने सांगितले. ट्रक…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी रज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात जन्माष्टमीच्या उत्सव साजरा होत आहे. तरुणाईसह राज्य सरकारही मोठ्या दणक्यात दहीहंडी साजरी करताना दिसून येत आहेत. विविध राजकिय नेत्यानी मुंबईतील वेगवेगळ्या भागात राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावत दहीहंडीच्या कार्यक्रमात भाग घेतला आहे. भाजप नेते करीट सोमय्या यांनीही दहीहंडी उत्सवात आपला सहभाग नोंदवला आहे . यावेळी त्यांनी या जोशात ताशा , ढोल वाजवाण्याचा आनंद घेतला. एवढ्यावरच नाना थांबता त किरीट सोमय्या यांनी डान्सही केला. त्याच्याडान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी राजधानी मुंबईमध्ये राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. भाजपा नेते प्रकाश सुर्वे यांनीसुद्धा मागाठाणे येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेसुद्धा तिथे उपस्थित होते. अनेक गोविंदा पथकांनी या उत्सवामध्ये भाग घेतला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करून गोविंदांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. “गोविंदा खेळाडू असून खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील. तसेच सर्व सुविधा मिळाल्यामुळे गोविंदांना आता कसे वाटते? मोकळे-मोकळे वाटते, छा-छान वाटते, असे मिश्किल भाष्यदेखील केले. यावेळी फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे इतर नेतेदेखील उपस्थित होते. दरम्यान, दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध भाजपा (BJP) असा सामना पाहायला मिळत आहे.…