धरणगाव प्रवेश मार्गावरील आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडण्यात आले

0
2

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी :

शिवसेना  युवा प्रमुख आदित्य ठाकरे आज (२० ऑगस्ट) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांचा हा दौरा सुरू होण्यापूर्वीच जळगावात शिंदे-ठाकरे गट व समर्थक आमने-सामने आले आहेत. अशातच मध्यरात्री धरणगावात प्रवेश मार्गावरील आदित्य ठाकरे यांचे स्वागताचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे गावात आता तणावाचे वातावरण निर्माण झालले आहे.

माहितीनुसार, सहा ते सात ठिकाणी आदित्य ठाकरेंचे स्वागताचे बॅनर फाडण्यात आले. द्वेष भावनेतून हे काम करण्यात आले असा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. आदित्य यांची ‘शिवसंवाद यात्रा’ आज जळगाव जिल्ह्यात येत आहे. या यात्रेचा दौरा आज दुपारी १ वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केला आहे. तसेच आज पाचोरा धरणगाव पारोळा या बंडखोरांच्या मतदारसंघात त्यांची सभादेखील होणार आहे. आदित्य ठाकरे शहरात येत असल्यामुळे शिवसेना व युवा सेनेकडून त्यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावण्यात आले होते; परंतु काही अज्ञातांकडून शहरातील गणेश नगर, हेडगेवार नगर, व उड्डाण पुलाजवळ शिव संवाद यात्रेचे स्वागत बॅनर तसेच, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही बॅनर फाडण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here