साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी
राज्यात मुलींची छेड काढण्याचं प्रमाण अधिक आहे. अशा प्रकरणामध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर अनेक आरोपींना पोलिसांनी शिक्षा दिली आहे. परंतु तरीही अशी प्रकरण उघडकीस येत आहेत. मुंबईतल्या घाटकोपरमधील कामराजनगरमध्ये
एका रोड रोमिओला रहिवाशांनी मारहाण केली आहे. एका 12 वर्षाच्या मुलीची छेड काढत असताना तिथं असलेल्या नागरिकांनी त्याचा चांगला चोप दिल्याची माहिती समजली आहे. ज्याला नागरिकांनी मारहाण केली, तो शाळेत जात असलेल्या मुलींना मारहाण करीत असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यावेळी आरोपी कृत्य करित होता. त्यावेळी त्याला मारहाण करुन नागरिकांनी त्यांची अर्धनग्न अवस्थेत वरात काढली.
अर्धनग्न अवस्थेत वरात देखील काढण्यात आली
मागच्या काही दिवसांपासून एक रोड रोमियो शाळेत जात असलेल्या मुलींची छेड काढीत असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. नागरिक फक्त एका तक्रारीची वाट पाहत होते. आज आरोपीने एका मुलीची छेड काढल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर तिथल्या नागरिकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. तसेच त्याची तिथं अर्धनग्न अवस्थेत वरात देखील काढण्यात आली. नागरिकांनी भर रस्त्यात ऊठाबशा काढायला लावल्या आणि तोंडाला काळ देखील फासलं आहे. रोडरोमियोच्या बहिणीने सुध्दा त्याला चोपला आहे. सदर घटनेचा व्हिडीयो व्हायरल झाला आहे. प्रकरणाची पोलिसांनी घेतली दखल घेतली असून तक्रार नोंद करण्याचं काम सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.