• Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
Saimat Live
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर
No Result
View All Result
Saimat Live
No Result
View All Result

गद्दारांचे मुखवटा फाडायला आलो ; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना इशारा

जळगावात ठिकठिकाणी होत आहे जल्लोषात स्वागत

Saimat by Saimat
August 20, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य
0

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी 

माजी पर्यावरण मंत्री तथा युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेनिमित्त आज जळगावात पोहचले. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर फाडल्यावरून आदित्य ठाकरेंनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना मोजक्या शब्दात बंडखोरांना इशारा दिला. ते म्हणाले की,गद्दार हे गद्दारच असतात मी आज गद्दारांचा मुखवटा काढण्यासाठी आलो आहे, जनतेचे आशीर्वाद घ्यायला आलो असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने आदित्य ठाकरे यांचे भव्य स्वागत करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी जळगाव विमानतळावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.


युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे राज्यात ठिकठिकाणी जाऊन पक्षाची भूमिका मांडत आहेत. निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद या नावाने त्यांच्या यात्रा सुरू आहेत. या अनुषंगाने आदित्य ठाकरे हे ९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर येणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. तथापि, ऐन वेळी म्हणजे ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. यानंतर ते आज सकाळी जिल्हा दौर्‍यावर आले आहे.

दरम्यान, धरणगावात प्रवेश मार्गावरील आदित्य ठाकरे यांचे स्वागताचे बॅनर कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना मध्यरात्री घडली. त्यावरून धरणगावात तणाव निर्माण झाला आहे. सहा ते सात ठिकाणी आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडण्यात आल्याचे समजते. द्वेष भावनेतून शिवसेना, युवासेनेचे स्वागत बॅनर फाडल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे, या घटनेमुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी जळगाव विमानतळावर आदित्य ठाकरे यांचे अतिशय उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यासह पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून निघाला. दरम्यान, जळगावात आकाशवाणी चौकात शिवसेना आणि युवासेनेतर्फे ठाकरे यांचा सत्कार होणार असून येथीलच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात त्यांचा सत्कार होणार आहे.

यानंतर, शिरसोली आणि वावडदा मार्गे ते पाचोरा तालुक्यात दाखल होणार आहेत. सामनेर, लासगाव, नांद्रा, हडसन, खेडगाव (नंदीचे), बिल्दी, गोराडखेडा येथील स्थानिक शिवसैनिक स्वागत करणार आहेत.

सामनेर येथुन ५०० मोटरसायकलची रॅली वरखेडी नाक्या पर्यंत काढण्यात येणार आहे. यानंतर ते मोठ्या ताफ्यासह भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात आल्यानंतर महाराणा प्रताप महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन व हुतात्मा स्मारकास भेट देतील. तसेच यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयाजवळ शिवसंवाद साधणार आहेत.

यानंतर आदित्य ठाकरे यांचे एरंडोल येथे भव्य स्वागत होणार आहे. येथून ते धरणगाव येथे जाणार असून तेथेही ते शिवसैनिक आणि युवासैनिकांशी संवाद साधणार आहेत. तेथून पारोळा येथे शिवसंवाद साधल्यानंतर ते धुळे येथे रवाना होणार आहेत.

Previous Post

आमच्या नादाला लागाल तर ठोकून काढणार – आशुतोष काळे

Next Post

आजचा सायंदैनिक साई मत ई-पेपर, २० ऑगस्ट २०२२ शनिवार

Next Post

आजचा सायंदैनिक साई मत ई-पेपर, २० ऑगस्ट २०२२ शनिवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वीज कोसळून दोन महिला ठार

September 26, 2023

जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धेत रायसोनी पब्लिक स्कूलचा संघ प्रथम‎

September 26, 2023

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात गणपती विसर्जन मिरवूणक उत्साहात

September 26, 2023

आता धनगरांनाही ५० दिवसांचा वायदा

September 26, 2023

जागतिक रुग्ण सुरक्षा सप्ताहानिमित्‍त जनजागृती

September 26, 2023

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात लर्निंग ओरिएंटेशन कार्यक्रम

September 26, 2023
  • Home
  • About
  • Team
  • Buy now!

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143

No Result
View All Result
  • Home
  • क्राईम
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • कासोदा
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • धरणगाव
    • जामनेर
    • धानोरा
    • पारोळा
    • फैजपूर
    • पाचोरा
    • मुक्ताईनगर
    • भुसावळ
    • बोदवड
    • यावल
    • रावेर
    • वरणगाव
    • शेंदुर्णी
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • शैक्षणिक
  • ई -पेपर

© 2020. Website Maintained by Tushar Bhambare. 09579794143