दहीहंडी उत्सवात फडणवीस यांचे तुफान भाषण

0
10

साईमत लाईव्ह  मुंबई  प्रतिनिधी 

राजधानी मुंबईमध्ये राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. भाजपा नेते प्रकाश सुर्वे यांनीसुद्धा मागाठाणे येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेसुद्धा तिथे उपस्थित होते. अनेक गोविंदा पथकांनी या उत्सवामध्ये भाग घेतला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करून गोविंदांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. “गोविंदा खेळाडू असून खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील. तसेच सर्व सुविधा मिळाल्यामुळे गोविंदांना आता कसे वाटते? मोकळे-मोकळे वाटते, छा-छान वाटते, असे मिश्किल भाष्यदेखील केले. यावेळी फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे इतर नेतेदेखील उपस्थित होते. दरम्यान, दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध भाजपा (BJP) असा सामना पाहायला मिळत आहे.

“भाजपा सरकार आल्यानंतर दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे, की दहीहंडी हा साहसी खेळ असल्यामुळे गोविंदा हे आता खेळाडू असतील. खेळाडूच्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील. कोणी जखमी झाले तर सरकार तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता कसे वाटते, मोकळे मोकळे वाटते. छान छान वाटते,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच आता आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडून विकासाच्या हंडीतून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम आपण करू, असेही फडणवीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here