NTA NEET UG निकाल होणार जाहीर, पाहा कधी अॅक्टिव्ह होणार लिंक

0
7

शनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) UG, 2022 साठी निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. NTA वेळापत्रकानुसार, NEET UG 2022 चा स्कोअर कार्ड neet.nta.nic.in वर अधिकृतपणे वेबसाइटवर आज प्रसिद्ध केला जाईल.

NEET Result 2022 LIVE Updates: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) UG, 2022 साठी निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. NTA वेळापत्रकानुसार, NEET UG 2022 चे स्कोअरकार्ड   neet.nta.nic.in. अधिकृतपणे वेबसाइटवर आज  प्रसिद्ध केले जातील. ही परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती. एका अहवालानुसार, सुमारे 18.72 लाख उमेदवारांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

NTA नुसार, 95 टक्के उमेदवारांनी NEET UG ची परीक्षा दिली होती. वैद्यकीय प्रवेश परीक्षा भारतातील 497 शहरांमध्ये आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 3,570 केंद्रांवर घेण्यात आली. NTA ने 31 ऑगस्ट रोजी सर्व कोडसाठी NEET ची अधिकृत उत्तरपत्रिका देखील जारी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here