मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर यावल येथे संपन्न

0
1

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.14 रोजी निशुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन यावल रावेर अश्विनी फाउंडेशन तर्फे घेण्यात आले.

निशुल्क नेत्र तपासणी शिबिरचे आयोजन हे यावल येथील जनसेवा येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी केले होते.या कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे होते तर उदघाट्क म्हणून आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे उपस्थित होते. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहर अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.सदर शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली या वेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना ऑपरेशन साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे रवाना केले गेले इतर रुग्णांना योग्य सल्ला व मार्गदर्शन केले गेले.आश्रय फाऊंडेशन व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली.या शिबिरात एकूण १०५ नेत्र रुग्णांची तपासणी व ११ रुग्णांची मोतीबिंदू शास्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले.

सदरील शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसर्डा यांनी मार्गदर्शन केले.व नेत्र चिकित्सक डॉ.गौरव शिंदे,डॉ.जॅकी शेख,विनोद पाटील यांनी रुग्ण बांधवांची तपासणी केली या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे,हेमराज फेगडे,डॉ.योगेश चौधरी,रोहिणी फेगडे,पत्रकार सुरेश पाटील,उज्वल कानडे डॉ.पवन सुशील,डॉ.प्रवीण पाटील,आदींची उपस्थिती होती,या शिबिरासाठी सागर लोहार,मनोज बारी,विशाल बारी,रितेश बारी आश्रय फाउंडेशन व जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here