Author: Saimat

साईमत लाईव्ह पाचोरा प्रतिनिधी राज्याचे विरोधीपक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज जिल्हा दौर्‍यावर आले आहे. सकाळी ११.३० वाजेच्या  सुमारास त्यांचे पाचोरा नगरीत आगमन झाले असता शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी यांचे औक्षण करत पाचोरा नगरीत स्वागत केले. अजितदादा पवार यांचा आज जळगाव जिल्हा दौरा आहे. यावेळी सुरूवातीला त्यांनी चाळीसगाव शहरात कार्यकर्त्यांशी भेट घेवून संवाद साधला त्यानंतर थेट पाचोरा शहरात सकाळी ११.३० वाजता दाखल झाले. शहरात दाखल होण्यापुर्वी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी शिवसेना नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी अजितदादाचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी  मंत्री आ. एकनाथराव…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचे निलंबन करण्यात आले. मराठा समाजाच्या संतापाची दखल घेऊन पोलिसांनी कारवाई केली. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर यांनी निलंबनाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या प्रकरणात बकालेंवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. मराठा समाजातील अनेक संघटना आक्रमक झाल्या. यानंतर पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची आधी बदली करण्यात आली लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना निलंबित करण्यात आले. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या प्रकरणात अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीचा…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.14 रोजी निशुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन यावल रावेर अश्विनी फाउंडेशन तर्फे घेण्यात आले. निशुल्क नेत्र तपासणी शिबिरचे आयोजन हे यावल येथील जनसेवा येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी केले होते.या कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे होते तर उदघाट्क म्हणून आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे उपस्थित होते. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहर अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.सदर शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली या वेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना ऑपरेशन साठी…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात दोरदार घमासान सुरु आहे. शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ सुरु असतानाच या वादात शिवसेना पदाधिकाऱ्याने उडी घेतली आहे. दसरा मेळाव्यावरुन शिवाजी पार्क मैदान कुदळ फावड्याने उखडून टाकू अशी डायरेक्ट धमकीच शिवसेनेने शिंदे गटाला दिली आहे. शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र, यावर अद्याप काहीही अपडेट समोर आलेली नाही. दसरा मेळावा कुठे घ्यायचा यावर चर्चा…

Read More

साईमत लाईव्ह प्रतिनिधी हिंगोलीः महाराष्ट्रातील वेदांता प्रकल्प गुजरातेत गेल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजप (BJP) सरकारवर सर्व स्तरांतून टीका होतेय. १ लाख तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने गुजरातेत कसा जाऊ दिला, असा प्रश्न विचारला जातोय. तर उद्योगमंत्री उदय सामंतांवरही (Uday Samant) हल्लाबोल केला जातोय. युवासेना नेते वरुण देसाई यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राज्यभरातील सर्व तरुणांनी उद्योगमंत्र्यांचा राजीनामा मागितला पाहिजे, असं वक्तव्य वरुण देसाई यांनी केलं. देसाई आज हिंगोली दौऱ्यावर होते. वेदांता प्रकल्पावरून उद्योगमंत्र्यांवर टीका करताना वरुण देसाई म्हणाले, ‘ उद्योगमंत्री स्वतः म्हणतात, मला याची कल्पनाच नाही. दीड लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट राज्यातून निघून…

Read More

साईमत लाईव्ह: रशियातील मॉस्को येथे उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्यापुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते. मॉस्कोतील ‘रुडमिनो मार्गारेटा फॉरेन लँग्वेज स्टडी’ या संस्थेने लोकशाही अण्णा भाऊ साठे यांचा हा पुतळा उभारला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा मॉस्कोच्या शासकीय वाचनालयात लावला जाणार आहे. अण्णा भाऊ साठेंचा आम्हाला अभिमान असल्याचे गौरवोद्गगार देवेंद्र फडणवीस यांनी काढले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की, वंचितांचे आवाज असलेले अण्णा भाऊ साठे यांचे भारतीय स्वतंत्रता संग्राम व गोव्याच्या मुक्ती संग्रामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. रशियाने आज त्यांचा गौरव केल्याने आम्हाला अभिमान वाटत आहे. शिवाय,…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यासोबतच कडू यांचा जामीन अर्ज गिरगाव न्यायालयाने फेटाळून लावला आहे. माहितीनुसार, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कडू यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. राजकीय आंदोलनाप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने बच्चू कडू यांच्या विरोधात जामीनपत्र वॉरंट बजावला होता. तसेच कडू हे आज न्यायालयासमोर हजर झाले असता त्यांनी जामिनासाठी अर्ज केला; परंतु हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. यामुळे आता बच्चू कडू यांना…

Read More

साईमत लाईव्ह प्रतिनिधी : अहमदाबादमध्ये एक अत्यंत भयानक दुर्घटना घडली आहे. गुजरात विद्यापीठाजवळ एस्पायर-2 नावाच्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. निर्माणाधीन असलेल्या या इमारतीच्या सातव्या मजल्यावर लिफ्ट तुटली. त्यामुळे या सात मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींना अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. त्यावेळी ही दुर्घटना घडली. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी मजूरांना तात्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून ‘मविआ’ सरकारवर खापर फोडले आहे. गेली दोन वर्षे कंपनीला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी ‘मविआ’वर टीका केली. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण आता तापताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीतील नेतेमंडळी आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मुंबईत दसरा मेळाव्यासंदर्भात काल एक महत्वाची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, “आम्हाला तर दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांता कंपनीच्या प्रमुखांशी माझी चर्चा झाली होती. सरकार त्यांना प्रकल्पासाठी जी काही मदत हवी ती देईल, असे बोलणे…

Read More

साईमत लाईव्ह  पाचोरा प्रतिनिधी तालुक्यातील एका नराधम बापाने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून , बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस  ठाण्यात  पीडित मुलीच्या आईच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान , त्या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नराधम बाप आपल्या १५ वर्षीय मुलीला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवायचा. तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. हा किळसवाणा प्रकार मागील तीन वर्षापासून पासून सुरु होता. नराधम बाप मुलीला तुझ्या आईला घराबाहेर काढेन, अशी धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी अन्याय सहन करत होती. मात्र मागील काही…

Read More