हिंगणा शिवारात सर्पमित्रांनी पकडला अजगर प्रजातीचा सर्प

0
1

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी

तालुक्यातील हिंगणा शिवारात मुक्ताईनगर रस्त्यावरील विजय आनफाट यांच्या शेतात अजगर प्रजातीचा सर्प आढळल्याने त्यांनी सर्पमित्र वैभव बच्छाव , कडू बावस्कर , सागर मोरे यांना संपर्क केला. त्यानंतर सर्पमित्र परिसरात दाखल होत रेस्क्यू ऑपरेशन करत आठ फुट लांब बिनविषारी अजगर प्रजातीचा सर्प पकडला.

त्यानंतर, आमदगाव येथील वन विभागाचे कर्मचारी डिगांबर पाटील यांना देण्यात आल्यावर अजगराला माळेगांव महाकाली जंगलात सोडण्यात आले. सर्पमित्र वैभव बच्छाव , कडू बावस्कर , सागर मोरे नांदगाव प्रतिभानगर येथील सर्पमित्रांनी याअगोदर अनेक सर्पांना जिवदान दिलेले आहे. यापुर्वी , घोणस , मन्यार असे इतर सर्प पकडले असून अजगर पहिल्यांदाच आढळल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. यातील सर्पमित्र वैभव बच्छाव यांच्या कार्याची दखल घेऊन हिंगोली मध्ये द रिअल हिरो २०२२ पुरस्कार देउन सन्मानित केले आहे. तालुक्यात सर्प आढळल्यास कडु बावस्कर 8888633775 , वैभव बच्छाव 9923248296 , सागर मोरे 9960535435 संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here