ग्रामरोजगार सेवकांनी विस हजार मानधन द्या ; सेवकांची मागणी

0
1

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व कामे करीत असलेले ग्रामरोजगार सेवक गेल्या काही वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करीत असुन ते ही मानधन वेळेवर मिळत नाही तरी शासनाने ह्या ग्राम रोजगार सेवकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे व महीन्याकाठी विस हजार मानधन द्यावे अशी मागणी रोजगार सेवकांनी केली आहे.

सोयगाव तालुक्यात जवळपास ४६ ग्रामरोजगार सेवक कार्यरत असुन ह्या रोजगार सेवकाकडे ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेअंतर्गत होणारे कामे शेततळे, वैयक्तिक सिंचन विहीर, घरकुल योजना,रमाई घरकुल प्रधाणमंत्री आवास योजना,गायगोठा,कंपारमेंड बिल्डीग,मातीनाला, तलावातील गाळ उपसा, पाणंद रस्ते,व‌क्षलागवड आदी कामे करण्यात येत असुन ग्रामपंचायतचे रेकार्ड सांभाळणे, मजुरांना काम उपलब्ध करुन देणे, कामावरील हजेरीपट भरणे,तसेच हजेरीपट भरुन पंचायत समिती येथे देऊन काम झालेली बिल पास करण्यासाठी नेहमी तालुक्याच्या गावी वेळोवेळी चकरा माराव्या लागतात तेथे जावुन देखील लागणारी मस्टर वेळेवर मिळत नसल्याने अनेकवेळा रीकाम्याहाताने घरी परतावे लागते पंचायत समिती मध्ये देखील ह्या रोजगार सेवकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याने कामे तरी कशी करायची अशी चिंता रोजगार सेवकांना पडली आहे तसेच गावातील रोजगार हमी योजनेअंतर्गत होत असलेली कामावरील लाभार्थ्यांना वेळेवर मोबादला मिळाला नाहीतर जबाबदारी म्हणुन रोजगार सेवकाकडे बोट दाखविले जाते अशा अनेक समस्या काम करतांना उद्धवत असुन गेल्या १७ वर्षांपासून रोजगार सेवक हा तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहे परंतु तेही मानधन वेळेवर मिळत नाही अशात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न रोजगार सेवकांना पडला आहे तरी ह्या रोजगार सेवकांना महीन्याकाठी विस हजार रुपये मानधन द्यावे अशी मागणी ग्रामरोजगार सेवक संघटनांचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष समाधान जाधव,सचिव सांडु राठोड, भास्कर गवळी,चंद्रसिंग शिंदे, सुनिल दामोदर,धनराज चव्हाण, संजय शेवाळे, कैलास जाधव,पोपट पाटील, मिलींद संसारे, युवराज चव्हाण आदींनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here