जनता शॉपीचे संचालक विनोद जवाहरानी (बंटी शेठ) यांचे निधन

0
1

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

शहरातील टॉवर चौकातील प्रसिध्द जनता शॉपीचे संचालक विनोद (बंटी शेठ) शितलदास जवाहरानी  (वय ५६) यांचे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ‘कांचन’, ६२, आदर्श नगर, आरटीओ रोड या त्यांच्या निवासस्थानापासून सकाळी ९ वाजेच्या सुमारास निघेल. त्यांच्या पार्थिवावर नेरी नाका येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा मोठा परिवार आहे. ते डॉ.चिमरन जेठवानी व सुरेश जेठवानी यांचे मेव्हणे तर जळगाव शहर पुज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष शितलदास जवाहरानी यांचे पुत्र तर जनता शॉपीचे संचालक राजेश जवाहरानी यांचे बंधु होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here