बोदवड तालुक्याची आढावा बैठकीत आमदार एकनाथ खडसे यांनी सुणावले खडे बोल जनतेचे काम लवकरात लवकर – खडसे

0
44

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी 

बोदवड ता.बोदवड:-बोदवड तालुक्यात विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत सर्व खात्याचे अधिकारी सर्व तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिक यांच्या उपस्थितीत बोदवड तहसील मध्ये आढावा बैठक घेण्यात आली.

आढावा बैठक म्हणजे २ ते ३ महिने झाले आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघांमध्ये ऍडव्होकेट सौ रोहिणी खेवलकर यांनी जनसंवाद यात्रा करून मतदारसंघ पिंजून काढला त्यामध्ये काही कार्यकर्ते काही नागरिकाच्या ज्या ज्या समस्या होत्या या सर्व लिहिल्या जात होत्या. त्या समस्यांचं निवारण व्हावं त्याकरता ही आढावा बैठक घेण्यात आली बैठकीला सर्व अधिकारी वर्ग व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते सर्व उपस्थित होते. त्यावेळेला सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी सामान्य जनतेचे असो किंवा मोठ्या माणसाची असो कामे लवकरात लवकर करून द्यावी अशा सूचना दिल्या काही तांत्रिक बाब असेल तर त्याची पूर्तता नागरिकाकडून करून घ्यावी तसेच एखादा कागद कमी असेल कोणताही दाखला कमी असेल तर त्याला समजून सांगावे व कामे लवकरात लवकर करा असे मार्गदर्शन शैक्षणिक,वैद्यकीय,शेतकरी-कष्टकरी,बाल-वृद्द बाधवांची कामांसंदर्भात भटकंती सहन करणार नाही आमदार एकनाथ खडसे अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली.

विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे रोहिनी खेवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बोदवड तालुक्याची आढावा बैठक पार पडली.
त्यावेळी तालुक्यातील सर्व अधिकारी वर्गा सहित तालुक्यातील माजी जिल्हा परिषेद सदस्य यांचे पती रामदास पाटील, आबा पाटील ,नईम बागवान,विनोद कोळी, प्रमोद धामोडे, हे नागरीकांचे विविध समस्या घेऊन उपस्थित होते.
गेल्या ७ ते ८ महिन्यापासून प्रलंबित असलेली काम लवकर पूर्ण करा असे आदेश विधानपरिषदेचे आमदार एकनाथरावजी खडसे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here