Author: Saimat

साईमत लाईव्ह अमळनेर प्रतिनिधी  लोकमान्य विद्यालय अमळनेर मध्ये राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत पर्यावरण पुरक उपक्रम म्हणुन “चित्रदुर्गा” ची दररोज चलस्थापना करण्यात आली. विद्यालयात नवरात्रीचे नऊ दिवस विद्यालयाचे कला शिक्षक श्री.मनोहर महाजन यांनी शाळेच्या फळ्यावर रंगीत खडू च्या साहाय्याने,श्री तुळजाभवानी (तुळजापूर),श्री महालक्ष्मी (कोल्हापूर)श्री.रेणुका माता(माहुर गड)श्री अंबादेवी (अमरावती)श्री रेणुका माता चांदवड)श्री भुमि माता(श्री मंडळ ग्रह मंदिर अमळनेर),राज राजेश्वरी पेडकाई माता ,श्री सप्तशृंगी देवी (वणी गड)श्री एकवीरा देवी (धुळे),याची चित्र काढून दररोज आरती व विधीवत पुजा करण्यात आली.या पर्यावरण पुरक धार्मिक उपक्रमास , जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक.श्री.नितिनजी‌ बचाव साहेब, जळगाव, यांनी भेट देऊन उपक्रमांचे कौतुक केले.या पर्यावरण उपक्रमांची संकल्पना व चित्र-श्री.मनोहर महाजन,(कला शिक्षक)याची तर…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव सा.बा.उत्तर विभागातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे विशिष्ट ठेकेदारांना झुकते माप दिले जात असल्यामुळे अनेक ठेकेदारांनी बंड पुकारले असून मंत्रालयापर्यंत तक्रारी सुरु झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. जळगाव सा.बा.उत्तर विभागातील कामे काही दिवसांपासून बीएनए भुसावळ याच एजन्सीला दिली जात आहेत. अगदी काही दिवसांपूर्वी निघालेल्या ई-टेंडरची बहुतांश कामे देखील बीएनएलाच देण्यात आली. त्यामुळे इतर ठेकेदार कमालीचे संतप्त झाले आहे. जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बीएनएच्या गुणवत्तेच्या कामाचा दाखला दिला जातो. परंतू बाकीचे ठेकेदार गुणवत्ता पूर्वक कामे करत नाही का?, असा सवाल उर्वरित ठेकेदारांनी उपस्थित केला. एवढेच नव्हे तर, याबाबत आता पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच सार्वजनिक…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी दिव्यांगाच्या प्रहार अपंग क्रांती आंदोलन च्या तालुकाध्यक्ष वर सोयगाव पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्या प्रकरणी व इतर मागण्यांसाठी गुरुवारी सोयगाव तहसिल कार्यालयांवर दिव्यांगांनी डफडे वाजवून आंदोलन केले तर दिलेल्या आश्वासनाचे लेखी मिळत नसल्याने संतप्त दिव्यांगानी थेट तहसिल कार्यालयात प्रवेस केला होता. प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे तालुकाध्यक्ष संदीप इंगळे हे ७३ टक्के अपंग असताना त्यांचेवर सोयगाव पोलिसांनी मारहाण केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला यासह इतर तीन मागण्यांसाठी सोयगाव तहसिल कार्यालतावर प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे शहराध्यक्ष यासीन बेग,हकीम शहा यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी डफडे आंदोलन करण्यात आले यामध्ये खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर दिव्यांग कायदा २०१६…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सोयगाव तालुक्यातील ठाणा, फर्दापूर, धनवट, वरखेडी तांडा, जंगला तांडा, फर्दापूर तांडा, सोयगाव, गलवाडा, वेताळवाडी या गावात मातोश्री पाणंद रस्ता विकास योजनेसह विविध विकास कामांसाठी 12 कोटी 10 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली. या विकास कामांचे भूमिपूजन मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. भूमिपूजन झालेल्या वरील विविध गावांत मातोश्री पाणंद रस्ते, लेखाशीर्ष 2515, 3054, एफडीआर 3054 – 2419 आदी योजनेतून रस्ते विकासासह विविध विकास कामे हाती घेण्यात येणार आहे. भूमिपूजन करण्यात आलेली कामे तातडीने सुरू करण्यात यावी. करण्यात येणारी विकास कामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री अब्दुल…

Read More

साईमत लाईव्ह  यावल प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना यांच्या मागणी संदर्भात यावल तालुका ग्रामरोजगार सेवक संघटना यांनी काल दि.3 रोजी यावल पंचायत समिती कार्यालया समोर एक दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण केले. महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्याध्यक्ष विलासराव जोगदंडे, कार्याध्यक्ष बाळासाहेब तायडे, उपाध्यक्ष दयानंद कांबळे, महासचिव राजेंद्र जितकर, कोषाध्यक्ष वासुदेव गोतमारे, यांच्या आदेशान्वये यावल पंचायत समिती येथे एक दिवशीय लक्षण व धरणे आंदोलन पार अध्यक्ष बाळासाहेब तायडे व संघटक खुशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले,ग्राम रोजगार सेवकांच्या 14 वर्षापासून असलेल्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यव्यापी एक दिवसीय उपोषण व निदर्शने करण्यात आली. शासनाच्या निदर्शनास काही बाबी आणून…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहरातील टॉवर चौकातील प्रसिध्द जनता शॉपीचे संचालक विनोद (बंटी शेठ) शितलदास जवाहरानी  (वय ५६) यांचे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ‘कांचन’, ६२, आदर्श नगर, आरटीओ रोड या त्यांच्या निवासस्थानापासून सकाळी ९ वाजेच्या सुमारास निघेल. त्यांच्या पार्थिवावर नेरी नाका येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा मोठा परिवार आहे. ते डॉ.चिमरन जेठवानी व सुरेश जेठवानी यांचे मेव्हणे तर जळगाव शहर पुज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष शितलदास जवाहरानी यांचे पुत्र तर जनता शॉपीचे संचालक राजेश जवाहरानी यांचे बंधु होत.

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व कामे करीत असलेले ग्रामरोजगार सेवक गेल्या काही वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करीत असुन ते ही मानधन वेळेवर मिळत नाही तरी शासनाने ह्या ग्राम रोजगार सेवकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे व महीन्याकाठी विस हजार मानधन द्यावे अशी मागणी रोजगार सेवकांनी केली आहे. सोयगाव तालुक्यात जवळपास ४६ ग्रामरोजगार सेवक कार्यरत असुन ह्या रोजगार सेवकाकडे ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमी योजनेअंतर्गत होणारे कामे शेततळे, वैयक्तिक सिंचन विहीर, घरकुल योजना,रमाई घरकुल प्रधाणमंत्री आवास योजना,गायगोठा,कंपारमेंड बिल्डीग,मातीनाला, तलावातील गाळ उपसा, पाणंद रस्ते,व‌क्षलागवड आदी कामे करण्यात येत असुन ग्रामपंचायतचे रेकार्ड सांभाळणे, मजुरांना काम उपलब्ध करुन देणे,…

Read More

साईमत लाईव्ह  सोयगाव तालुका प्रतिनिधी मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास सोयगाव तालुक्यातून प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अ.सत्तार यांनी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले आहे. सिल्लोड – सोयगाव मतदारसंघातून 25 हजार पदाधिकारी कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी जाणार असून यासाठी 500 बसेसचे नियोजन मित्र मंडळाने केले असून महिला पुरुषांना स्वतंत्र बस असणार असल्याचे अब्दुल समीर म्हणाले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी मुंबई येथे होणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेना दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने सोयगाव शहरासह तालुक्यातील सवाळतबारा, फर्दापूर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या यावेळी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी विजय चौधरी औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात मुले पळविणारी टोळी आली आहे तसेच त्यांची वाहने फिरत आहेत अशी अफवांचे पेव मोठया प्रमाणावर सोशल मिडीयाचे माध्यमांतुन नागरिकांमध्ये पसरली आहे. वास्तवीक अशी कोणतीही घटना किंवा तसा प्रयत्न सुध्दा औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात घडलेला नाही. अशा घटनाबाबत पोलीसांना मिळणा-या माहितीला जिल्हा पोलीस दल हे सक्रिय व तत्परतेने जलद प्रतिसाद देत आहे. परंतु पोलीसांचे चौकशी मध्ये या फक्त अफवा असल्याचे निष्पन्न होत आहे. अशा अफवा मध्ये नागरिक हे त्यांचे परिसरात आलेल्या अनोळखी महिला, पुरूष, फिरस्ती व्यक्त्ती, भिकारी, यांची कोणतीही खातरजमा नकरता केवळ त्यांचे वेशभुषा व हालचालीवरून त्यांना मुले पळविणारी टोळीतील सदस्य असल्याचा…

Read More

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी वृत्तपत्रातून बातमी आल्याने पोलीस अधीक्षकाच्या आदेशाची पायमल्ली करून फक्त एक दिवस बंद पाळुन यावल शहरात ठिकठिकाणी जुगार व पन्नीची दारू सुरू झाली. यावल शहरात परिसरात जुगारामुळे पन्नीच्या दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले, असून बनावट केमिकल युक्त पन्नीच्या दारूमुळे तसेच बनावट देशी गावठी दारूमुळे अनेक युवक आणि नागरिकांचे अल्पावधीत निधन झाले. आणि बरेच युवक आजही मृत्यूच्या मार्गावर उभे आहेत.शहरात बोरावल गेट पासून इतर ठिकठिकाणी पन्नीची दारू अनधिकृत पणे खुलेआम विक्री होत आहे,या गंभीर समस्या व प्रकाराकडे,युवक वर्गाच्या आरोग्य हिताच्या दृष्टिकोनाकड़े समाज शासन प्रत्यक्ष बघत असून अर्थप्राप्तीमुळे दुर्लक्ष करीत असल्याने समाजात पीडित कुटुंबांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत…

Read More