दिव्यांगाचे सोयगाव तहसिलवर डफडे बजाव आंदोलन…दिव्यांगाचे सोयगाव तहसिलवर डफडे बजाव आंदोलन

0
1

 

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

दिव्यांगाच्या प्रहार अपंग क्रांती आंदोलन च्या तालुकाध्यक्ष वर सोयगाव पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्या प्रकरणी व इतर मागण्यांसाठी गुरुवारी सोयगाव तहसिल कार्यालयांवर दिव्यांगांनी डफडे वाजवून आंदोलन केले तर दिलेल्या आश्वासनाचे लेखी मिळत नसल्याने संतप्त दिव्यांगानी थेट तहसिल कार्यालयात प्रवेस केला होता.

प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे तालुकाध्यक्ष संदीप इंगळे हे ७३ टक्के अपंग असताना त्यांचेवर सोयगाव पोलिसांनी मारहाण केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला यासह इतर तीन मागण्यांसाठी सोयगाव तहसिल कार्यालतावर प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे शहराध्यक्ष यासीन बेग,हकीम शहा यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी डफडे आंदोलन करण्यात आले यामध्ये खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर दिव्यांग कायदा २०१६ यानुसार गुन्हा दाखल करावा ,दिव्यांगाना अंत्योदय शिधापत्रिका दयाव्या,पंचायत समिती कार्यालयात दिव्यांगा साठी एक खिडकी योजना राबविण्यात यावी,संजय गांधी योजनेचे मानधन दर महा देण्यात यावे या मागण्यांसाठी तालुका प्रशासनाला जाग यावी यासाठी चारतास डफडे वाजवून आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदार रमेश जसवंत यांनी खोटा गुन्हा दाखल प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना चौकशी प्रस्ताव पाठविण्यात येऊन चौकशी करण्यात येईल असे आश्वासन देऊन इतर मागण्यांही मान्य करून त्वरित निकाली काढण्यात येईल असे आश्वासन दिल.

चौकट–दरम्यान दिलेल्या आश्वासन चे लेखी निवेदन दिव्यांगा ना मिळत नसल्याने संतप्त दिव्यांगानी थेट तहसिल कार्यालयात प्रवेश केला होता आश्वासन च्या लेखी साठी तहसिल कार्यालयासमोर ताटकळत बसून अखेर संतप्त दिव्यांगानी हा पवित्रा घेतला होता त्यानंतर तातडीने अंत्योदय शिधापत्रिका देण्याचे लेखी आश्वासन तालुका पुरवठा अधिकारी नाना मोरे यांनी दिले…यावेळी आंदोलनात अनिल लोखंडे, शहराध्यक्ष यासीन बेग,हकीम शहा,संजय मिसाळ, पंढरीनाथ मोरे,संदीप इंगळे,गजानन चव्हाण,मंगलाबाई जोहरे, वंदनाबाई दामधर,मंगलाबाई चौधरी,फर्जना शेख,उर्मिलाताई इंगळे आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here