आयुष्यमान भारत योजनेचा नव्याने सर्व्हे करा-मनसेची आरोग्यमंत्र्याकडे मागणी

0
2

साईमत लाईव्ह  उस्मानाबाद प्रतिनिधी:-

नळदुर्ग-आयुष्मान भारत ही आरोग्याशी निगड़ित महत्वपूर्ण योजना असून, केंद्र सरकारने सन २०१८ साली याची घोषणा केली होती. परंतु सन २०१०-११ च्या जनगणनानुसार सर्व्हे केल्याचे समजत आहे.

वास्तविक पाहता आताच्या जनगणनेनुसार सर्व्हे होणे अपेक्षित आहे. किंवा या योजनेसाठी स्वतंत्र सर्व्हे होऊन आर्थिक दृष्टया दुर्बल, गरजवंत, गरीब लोकांचा या योजनेत समावेश व्हावा कारण नळदुर्ग शहरातील आताच्या याद्या पाहल्या तर अनेक गरीब कुटुंबाची नावेच या योजनेत नाहीत. हा सर्व्हे नेमका कधी,कसा, कोणत्या आधारे झाला असा प्रश्न नागरिकातुन विचारला जात आहे. त्यामुळे या योजनेचा सर्वसामान्याना लाभ मिळवून देण्यासाठी स्वंतत्र सर्व्हे व्हावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्याचे आरोग्य मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालक मंत्री तानाजी सावंत, जिल्हाधिकारी, आरोग्य सेवा उपसंचालक,जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे,निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्षरी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here