दिक्षी येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
1

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी

ओझर पोलिस ठाणे हद्दीतील दिक्षी येथे एका युवकाने दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली काल गुरूवारी दुपारी 3 वाजेपुर्वी चेतन गोविंद फौजदार वय 20 राहाणार दिक्षी ता.निफाड याने त्याच्या राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली घटनेचे व्रुत समजताच पोलिस उपनिरिक्षक ए बी तोडमल हवालदार जे एम चौघुले,धारबळे, लहांगे ,भास्कर पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चेतनच्या म्रुतदेहाचे शवविच्छेदन नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात करण्यात आले त्यावेळी फॉरेन्सीक मेडिसिन एक्सपर्ट डॉ एच एन घांगले यांनी दिलेल्या अॅडव्हान्स डेथ सर्टीफिकेटनुसार ओझर पोलिसांनी आकस्मात म्रुत्युची नोंद केली असुन अधिक तपास जितेंद्र चौघुले हे करीत आहे.
चेतन हा संदीप फाउंडेशन मध्ये डिप्लोमाचे शिक्षण घेत होता तो मनमिळावू होता तरी ही त्याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here