साईमत लाईव्ह रावेर प्रतिनिधी
रावेर नगरपालिकेची सुमारे तीन वर्षांपूर्वी हद्दवाढ होऊन वाढीव वसाहतीचा भाग पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत या उलट मोठ्याप्रमाणात कर आकारणी लादण्यात आली आहे. या कर आकारणी विरुद्ध यलगार पुकारत नागरिकांनी रावेर नगरपालिकेवर मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिले आहे.
रावेर नगरपालिकेची सुमारे तीन वर्षांपूर्वी हद्दवाढ होऊन वाढीव वसाहतीचा भाग पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. परंतु नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. रस्ते नाही, गटारी नाही व स्ट्रीट लाईट नाही. असे असले तरी नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना घरपट्टीचे अव्वचेसव्वा बिले पाठवून कर आकारणी करण्यात आली आहे. त्याबाबत नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. परंतु आता पर्यंतचा पालिकेचा अनुभव पाहता हरकतींचा निव्वळ फार्स असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच बऱ्याच नागरिकांच्या घरांचे पत्ते व वर्णन चुकीचे नमूद केल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
त्याबद्दल काही नागरिकांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन यांच्या सोबत चर्चा करून याबाबत मार्ग काढण्याची विनंती केली असता त्यांनी तात्काळ दखल घेऊन पद्माकर महाजन यांचे नेतृत्वात शिष्टमंडळाने नगरपालिका कार्यलयात धडक मोर्चा नेत आधी नागरिकांना सुविधा द्या मग कराची मागणी करा. तसेच लवकरात लवकर केलेली अव्वाचेसव्वा करवाढ रद्द करा. हा अन्याय सहन केला जाणार नाही. अन्यथा यापुढे हजारोंच्या संख्येने नागरिकांचा मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी शहर अध्यक्ष दिलीप पाटील. तालुका सरचिटणीस सी. एस. पाटील, उपाध्यक्ष अरुण भाऊ शिंदे, राजेंद्र महाजन, सुधीर पाटील, यशवंत दलाल, योगेश गजरे, मनोज श्रावक, नितीन पाटील, अमोल पाटील, शहर सरचिटणीस रवींद्र पाटील, हिलाल सोनवणे, दिव्यांग आघाडीचे प्रमुख संजय महाराज, रजनीकांत बारी, प्रा. ई. जे. महाजन, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र महाजन, राकेश गडे, अल्पसंख्यांक अध्यक्ष अमजद भाई, उपाध्यक्ष भूषण महाजन, ॲड.प्रवीण पासपोहे, युवा मोर्चा पवन बोदडे, अब्दुल रफिक अब्दुल अजीज, शेख मंजूर शेख कादर, शेख कौसर शेख अजगर, शेख ग्यात शेख रशीद, शेख युसुफ शेख इब्राहिम, शेख मद्दरसअली शब्बीर अली, शेख गयास उद्दीन काजी, शेख रफिक शेख सत्तार, गणेश मराठे, धोंडू पासे, नामदेव महाजन, बाळा आमोदकर, धृव पाटील सहमोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.