Author: Saimat

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी  तालुक्यातील साकळी येथील मंडळ अधिकाऱ्यास वाळू तस्कराकडून शिवीगाळ,धक्का बुक्की करून शासकीय कामात अडथळा आणून अवैध वाळू वाहतुकीचे डंपर पळून नेल्याच्या कारणावरून अवैध वाळूची वाहतूक तस्करी करणाऱ्या चालकाविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.विशेष म्हणजे या प्रकरणात आणि यावल तालुक्यातील अवैध गौण खनिज व वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर, ट्रॅक्टर व ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर वाहन क्र.नसल्याने आरटीओसह यावल पोलिसांच्या वाहन तपासणीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये यावल तालुक्यातील साकळी येथील मंडळ अधिकारी सचिन जगताप यांनी गुरुवार दि.13 रोजी रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास साकळी येथील कोतवाल विशाल…

Read More

साईमत लाईव्ह  रावेर प्रतिनिधी रावेर नगरपालिकेची सुमारे तीन वर्षांपूर्वी हद्दवाढ होऊन वाढीव वसाहतीचा भाग पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत या उलट मोठ्याप्रमाणात कर आकारणी लादण्यात आली आहे. या कर आकारणी विरुद्ध  यलगार पुकारत नागरिकांनी रावेर नगरपालिकेवर मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिले आहे. रावेर नगरपालिकेची सुमारे तीन वर्षांपूर्वी हद्दवाढ होऊन वाढीव वसाहतीचा भाग पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. परंतु नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. रस्ते नाही, गटारी नाही व स्ट्रीट लाईट नाही. असे असले तरी नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना घरपट्टीचे अव्वचेसव्वा बिले पाठवून कर आकारणी करण्यात…

Read More

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर ) अहमदनगर १०५.९६ ९२.४९ अकोला १०६.१४ ९२.६९ अमरावती १०७.१४ ९३.६५ औरंगाबाद १०८.०० ९५.९६ भंडारा १०७.०१ ९३.५३ बीड १०७.९० ९४.३७ बुलढाणा १०६.८२ ९३.३४ चंद्रपूर १०६.५३ ९३.०७ धुळे १०६.०८ ९२.६१ गडचिरोली १०७.२६ ९३.७८ गोंदिया १०७.५३ ९४.०२ हिंगोली १०७.०६ ९३.५८…

Read More

साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील गेल्या तीन चार दिवसांपासून परतीच्या पावसाची जोरदार बरसात सुरू आहे. यामुळे नदी, नाले, तलाव धरण, भरले असून, काढणीस आलेले सोयाबीन व काढून टाकलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाने शेती शिवारात सर्वत्र पाणी साचून राहिल्याने शेताला तलावाचे स्वरूप आले असून काढणीला आलेले सोयाबीन, उडीद पीक पाण्यात गेले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या काढून टाकलेले सोयाबीन भिजले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रशासनाकडून पंचनामे करण्याची गरज आहे. सततच्या पावसाने पाणी लागून सोयाबीन पिवळे पडून नुकसान झाले आहे. पूर्वी झालेल्या पंचनाम्याची मदत शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे.

Read More

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी ओझर पोलिस ठाणे हद्दीतील दिक्षी येथे एका युवकाने दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली काल गुरूवारी दुपारी 3 वाजेपुर्वी चेतन गोविंद फौजदार वय 20 राहाणार दिक्षी ता.निफाड याने त्याच्या राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली घटनेचे व्रुत समजताच पोलिस उपनिरिक्षक ए बी तोडमल हवालदार जे एम चौघुले,धारबळे, लहांगे ,भास्कर पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चेतनच्या म्रुतदेहाचे शवविच्छेदन नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात करण्यात आले त्यावेळी फॉरेन्सीक मेडिसिन एक्सपर्ट डॉ एच एन घांगले यांनी दिलेल्या अॅडव्हान्स डेथ सर्टीफिकेटनुसार ओझर पोलिसांनी आकस्मात म्रुत्युची नोंद केली असुन अधिक तपास जितेंद्र चौघुले हे करीत आहे. चेतन हा संदीप फाउंडेशन…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’  हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला. तसेच उद्धव ठाकरे   आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांना शिवसेना हे पक्षाचे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे  यांनी प्रतिक्रिया दिली. बाळासाहेबांची वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली, हे अत्यंत क्लेशदायक… वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमवले ते मुलांनी एका मिनिटात गमावले, असे खडसेंनी म्हटले आहे. तसेच आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली, ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज केली, महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री…

Read More

साईमत लाईव्ह तुळजापूर प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांचे हस्ते जळकोट ता. तुळजापूर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उद्‌घाटन व लोकार्पण करण्यात आले. मनसे नेते अमित ठाकरे यांनी जळकोट गावास भेट दिली असता, ग्रा पं . सदस्य तथा मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी त्यांना ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांबाबत माहिती दिली. ठाकरे यांनी झालेल्या विकास कामांबाबत समाधान व्यक्त करून या कामांचे उद्‌घाटन आणि लोकार्पण केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळकोट गावचे सरपंच अशोक पाटील तर जि.प.सदस्य प्रकाश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन…

Read More

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील शेलवड येथिल संजय सिताराम सोनवणे वय ४७ यांनी शेलवड शिवारातील स्वतच्या शेतात निबाच्या झाडाला दुपारी ऐक ते दिडच्या सुमारास फाशी घेतली. आत्महत्या झाल्याची वार्ता शुभम सुरेश अहिर यानी दिली. विविध कार्यकारी सोसायटी व ईतर कर्ज शेतकर् यावर असल्याची गावात चर्चा आहे. बोदवड पोलिस स्टेशनमध्ये नोद दाखल असुन पोलिस निरीक्षक याच्या मार्गदर्शनात पो काँ संजय महाजन हे पुढील तपास करीत आहे. तर त्याचे ग्रामिण रुग्णालयात शव विच्छेदन डाँ किर्ती साळी यानी केले.

Read More

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथे मुस्लिम समाजाच्या वतीने ईद ऐ मिलाद च्या निमित्ताने उत्सव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते जुन्यागावातील सुन्नी जमा मज्जीद मधून ही मिरवणूक बस्थानकाकडे वाजत गाजत काढण्यात आली यावेळी मुस्लिम समाजबांधवांकडून गोड भाताचा प्रसाद वाटप करण्यात आला कजगाव परिसर मुस्लिम पंच कमिटीच्या वतीने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मज्जीद चे मौलाना मोहमंद रियाज. मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष खालिक मणियार.सत्तार बागवान.शौकत पिंजारी .अबरार खाटीक.अमजद शाह.नासिर खाटीक.झाकीर खाटीक.अमीन शाह. मुजाहिद खाटीक .खालिद मणियार. मुस्ताक खाटीक .अय्युब खाटीक. आसिफ पिंजारी , रियाज खाटीक.हनिफ मणियार.आरीफ मलीक, व असंख्य मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. https://youtu.be/fpeBWbZIl7Q

Read More

साईमत लाईव्ह निंभोरा ता. रावेर प्रतिनिधी निंभोरा पोलिस ठाण्यांतर्गत २९ गावांचा समावेश आहे. या परिसरात अवैध दारुविक्री व वाहतूक, मटका, गांजाविक्री, जुगार, अवैध वाळूवाहतुक व इतर अवैध धंदे पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत खुलेआम पोलिसांच्या नजरेखाली सुरु आहेत. या अवैध धंद्यांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश लावणार, की सुरु ठेवणार? किंवा यापैकी कोणते धोरण अवलंबितात याकडे सर्व नागरीकांचे लक्ष लागले आहे. घाम न गाळता सर्वांना हवाय मेवा सध्या निंभोरा पोलीस स्थानकाच्या हद्दीत अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही परिस्थिती अनेकांचे संसार उधवस्त करीत आहेत. परंतू ‘घाम न गाळता सर्वांना हवाय मेवा’. यामुळे तरुण पिढी या अवैध धंद्यात गुंतली असून मटका, जुगार, दारु,…

Read More