Author: Saimat

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी  सविधांनामुळेच लोकशाही बळकट झाली आहे. सविधांनामुळेच समाजाचा सर्वांगिण विकास झाला आहे. असे प्रतिवादन ॲड. अर्जुन पाटील यांनी आज सविधांन दिनानिर्मित बोदवड न्यायालयात आयोजित कार्यक्रमात केले. आज बोदवड येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयात सविधांन दिनानिर्मित सकाळी 10 वाजता कार्यक्रमाचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयात सविधांन उद्देशिकाचे ॲड. अर्जुन पाटील यांनी उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन केले व सर्वाना सविधांनाच्या उद्देशिकेचे वाटप करण्यात आले. सविधांनास नमन व पुजन करण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात बोदवड वकिल संघाचे उपाध्यक्ष धनराज प्रजापती यांनी “सविधांन आणि न्यायालयाचे महत्व” या विषयावर अभ्यासपुर्ण विचार मांडले. तसेच ॲड. के.एस. इंगळे यांनी सविधांनवर गाणे…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान व नागरीकांना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आज शनिवारी शहीद दिनानिमीत्त रक्तदान शिबिर आयोजीत करून अभिवादन करण्यात आले. या रक्तदान शिबीराला रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सुमारे 44 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यातून 44 बाटल्या रक्त संकलीत झाले. यासाठी जीवन सुरभी ब्लड बँकेेचे सहकार्य लाभले. देशाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून शहीद दिनानिमीत्त चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन, चाळीसगाव जॉगिंग असो. व चाळीसगाव सायकल गृपच्या वतीने पोलीस स्टेशन आवारात रक्तदान शिबिर आयोजीत केले होते.प्रारंभी 26/11च्या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एन के वाकलकर साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, प्रितेश…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी च्या बी.पी.आर्ट्स,एस.एम.ए सायन्स अँड के.के.सी कॉमर्स महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी भारतीय लोकशाही ही जगातील सर्वोत्तम लोकशाही संविधानामुळेच असल्याचे सांगितले. संविधान निर्मात्यांचे उपकार म्हणून हा दिवस लोकोत्सव व्हावा अशी अपेक्षा त्यांनी मनोगतातून व्यक्त केली.तसेच संविधानांचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलची कृतज्ञता त्यांनी मनोगतातुन व्यक्त केली.कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.अजय काटे,विभाग प्रमुख प्रा.मुकुंद अहिरे तसेच पदवी व पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा.नितीन नन्नावरे यांनी संविधान दिवसाचे महत्त्व विशद केले.तर आभार प्रा.अहिरे यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.रविंद्र पाटील यांनी केले.या कार्यक्रमात मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील…

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी नानसो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा देवळी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सतिष पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.राजेंद्र भोसले यांनी दिपप्रज्वलन करून प्रतिमापूजन केले. शाळेतील शिक्षिका श्रीमती.सरला महाले यांनी संविधान वाचन केले. श्री.राजू पाटील व श्रीमती अर्चना मोरे यांनी संविधान दिनाविषयी माहिती सांगितली. तसेच शाळेत संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमास शाळेतील मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, अधिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विनोद पाटील तर आभार श्री.रमाकांत कापडणिस यांनी व्यक्त केले.

Read More

साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, यांच्या “विद्यार्थी वैद्यकीय तपासणी योजना”, अंतर्गत बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स कॉलेज यांच्या वतीने व जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन, चाळीसगाव, इंडियन मेडिकल असोसिएशन चाप्टर चाळीसगाव. यांच्या सहकार्याने महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वैद्यकीय शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव तथा आयएमए चाळीसगाव चे अध्यक्ष मा. डॉ. विनोदजी कोतकर हे होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये चाळीसगाव नगरीतील सुपरिचित तज्ञ डॉक्टर डॉ. सुजित वाघ अध्यक्ष जेपीए चाळीसगाव , डॉ. सुधनवा कुलकर्णी, डॉ. प्रवीण भोकरे, डॉ. प्रशांत सिनकर, डॉ. हर्षल सोनवणे, डॉ. किरण…

Read More

साईमत लाईव्ह  बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील वडजी येथील सिद्धार्थ प्रकाश सपकाळे वय २५ या पंचवीस वर्षीय तरुणाने भागवत इंगळे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाच्या फांदीवर दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना दुपारी बाराचे सुमारास उघडकीस आली. ही आत्महत्या सकाळ ते बारा वाजेच्या दरम्यान घडली असल्याचा अंदाज आहे. मयत सिद्धार्थ कुटुंबातील सर्वात लहान होता त्याचे पश्चात आई ,वडील, मोठा भाऊ व विवाहित बहिणी असा परिवार आहे.या घटने बाबत मयताचा भाऊ विनोद प्रकाश सपकाळे याचे खबरी वरून बोदवड पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यू नोंद झाली असून पुढील तपास हे.कॉ.वसंत निकम हे करीत आहेत.

Read More

साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या सूचनेप्रमाणे गावठी दारू विरुद्ध मोहीम सुरू केली आहे आज सकाळी बोदवड पोलिसांनी शेलवड येथे गावठी दारूचा अड्डा उध्वस्त केला आहे. तीन दिवसापूर्वी बोदवड शिवारातील दारू नष्ट केल्यानंतर आज सकाळी ७.३० सुमारास तालुक्यातील शेलवड शिवारातील कुरण तलावाजवळ आनंद गुलाब धुलकर वय ३५ राहणार भीलवाडा बोदवड यांच्या ताब्यातील ४ ड्रम कच्चे ८०० लिटर कच्चे रसायन व २०० लिटर उकळते पक्के रसायन चालू भट्टी व ८० लिटर तयार हात भट्टी दारु वरील तयार दारू सह १३ हजारांचा मुद्देमाल मिळून आला हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला करत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५( फ ).(ब) क…

Read More

साईमत लाईव्ह बोदवड  प्रतिनिधी जिल्हाभरात वार्याच्या वेगासारखा व्हायरल झालेला शिरसाळा मारोतीरायाचा फोटो 24 तासात दहा लाखांहून अधिक भाविकांपर्यंत सोशल मिडियाच्या माध्यमातून पोहोचला. परंतु , व्हायरल झालेल्या फोटोत मुर्तीच्या सावलीत मारोतीराराचे प्रतीरुप दिसत असलेले छायाचित्र नेमके कोणी काढले ? हा फोटो बनावट तर नाही ना ? अशी विचारणा मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून होत होती. या घटनेच्या दुसर्या बाजुचा शोध घेत नेमके सत्य काय हे जाणुन घेण्याचा प्रयत्न छायाचित्र काढणाऱ्या जळगांव येथील जिजाऊ नगर येथील रहिवाशी तरुण चेतन बाविस्कर यांच्याशी संवाद साधण्यात आला. मुर्तीच्या सावलीत मारोतीरायाचे प्रतीरुप दिसत असलेले छायाचित्र व्हाट्सअप वर एका तरुणाचे स्टेटस लावलेले असल्याचे निदर्शनास आल्यावर ते छायाचित्र शिरसाळा मारोतीरायाचे…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी कजगाव ता.भडगाव येथुन जवळच असलेल्या श्री.क्षेत्र गोंडगाव येथे होणाऱ्या जपानुष्ठान ची तयारी जोरात सुरू झाली असुन कजगाव पारोळा मार्गावर उभारण्यात येत असलेले विविध मंडप प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने श्री.१००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेन श्री. क्षेत्र गोंडगाव ता.भडगाव येथे राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा दि.२८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर असं सप्ताहभर धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन यात लाखो बाबाजी भक्त सह भाविक सहभागी होणार आहेत. बाबाजींचे ३३ वे पुण्यस्मरण दिनांक २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत भव्यदिव्य स्वरूपात आयोजित केले जाणार आहे तसेच कै. विजकुमार सुदर्शन…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव ता.भडगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील ग्रामपंचायत च्या निवडणुकीचा बिगुल आता वाजला आहे यंदाची निवडणूक ही लोकनियुक्त सरपंच निवड पद्धतीने होणार आहे मागील पंचवार्षिक निवडणूकही लोकनियुक्त सरपंच निवडणूकीतून झाली होती आता ही कजगावचा सरपंच हा लोकनियुक्त पद्धतीने निवडला जाणार आहे सतरा ग्रा प सदस्य व एक लोकनियुक्त सरपंच अश्या अठरा जागांसाठी ही सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. लोकनियुक्त सरपंच पदासाठी अनेकांनी आता पासूनच कंबर कसली आहेत आजी माजी सरपंचासह आजी माजी सदस्य अनेक तरुण व अनेक उद्योजक ग्रामस्थ ह्या लोकनियुक्त च्या स्पर्धेत उतरण्याचे संकेत देत आहेत आगामी निवडणुकीत अनेक मातब्बर आपली राजकीय ताकत दावावर लावण्याची शक्यता आहे…

Read More