Author: Saimat

साईमत लाईव्ह जरंडी प्रतिनिध राष्ट्रनिष्ठा ज्यांच्या आचार-विचारांत भरली होती ज्यांनी लोकांच्या न्यायहक्कासाठी प्रयत्नांची  परिकाष्ठा केली.अशा विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी जरंडी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना व त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले यावेळी सिद्धार्थ मोरे,सुरेश चनाल, अशोक सावळे,सोपान मोरे,संतोष मोरे,सिद्धार्थ दांडगे,मधुकर सोनवणे,प्रदीप जगताप,संतोष मोरे,भिका शिंदे,ज्ञानेश्वर मोरे,रमेश मोरे, त्र्यंबक मोरे,यशवंत कोतकर,प्रकाश मोरे,नामदेव साळवे, राहुल दांडगे, सागर  साळवे, यांच्या सह इतर बौद्ध समाज महिला भगिनी व बौद्ध बांधव व ग्रामस्थ मोठया संख्येने  उपस्थित होते.

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी   महाराष्ट्र शासन तर्फे विद्यार्थ्यांच्या सुदृढ व तंदुरुस्त शरीरासाठी विविध योजना राबवत असताना त्याच उद्देशाने क्रीडा स्पर्धांचेही आयोजन केले जाते. हॉकी स्पर्धांमध्ये मिल्लत हायस्कूल, मेहरूण, जळगावच्या संघाने बाजी मारली मागील परंपरा कायम ठेवत यंदाही विजयी पदक पटकावले. अँग्लो उर्दू हायस्कूल सोबत चुरशीच्या स्पर्धेनंतर बाजी मारली. मिल्लतच्या या संघात इयत्ता 10वी (ब) च्या विद्यार्थ्यांमध्ये उमर शेख नईमुद्दीन, जोहैब झाकीर हुसेन, मंजर सय्यद अलीम उत्कृष्ट कामगिरी केली त्याबद्दल त्यांना शाळेतर्फे पारितोषिक देण्यात आले. क्रीडा शिक्षक मुख्तार सय्यद यांनी खेळाडूंना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. मिल्लत व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहम्मद रफिक शाह सर, इतर विश्वस्तांसह शिक्षिका अफिफा शाहीन मॅडम, पर्यवेक्षक ताजुद्दीन शेख…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये, पूर्व प्राथमिक विभागात “आजी-आजोबा मेळावा” उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आजी आजोबांचे स्वागत ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून व त्यांनी  स्वहस्ते बनवलेले ग्रीटिंग कार्ड देऊन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे अरविंद मार्तंड देशपांडे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, माध्यमिक विभागाच्या समन्वयिका संगीता तळेले यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून आजी-आजोबांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रमुख नीलिमा शुक्ला होत्या. त्यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या प्रास्तविकेनंतर आजी-आजोबांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात फुंकर मारून कप उडवणे, तसेच प्रश्न उत्तरांचा खेळ…

Read More

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी सध्याचे युग दिवसेंदिवस प्रगती करीत असले तरी अद्यापही दिव्यांगत्व रोखणे शक्य नाही. तंत्रज्ञानाने प्रगती केल्याने जन्माच्या अगोदरपासून अपंगत्व कळते. वेळीच उपचार आणि मार्गदर्शन मिळाल्यास दिव्यांगत्व रोखणे किंवा कमी करणे शक्य होते. उडानच्या प्रारंभिक बालविकास केंद्राच्या माध्यमातून हे पुण्यकर्म शक्य होईल, असे प्रतिपादन दि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले. रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान प्रारंभिक बालविकास केंद्राचे लोकार्पण जागतिक दिव्यांग दिवसाचे औचित्य साधून करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर जयश्री महाजन प्रमुख पाहुणे म्हणून स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे दीपक चौधरी, सोयो सिस्टीमचे किशोर ढाके, के.के.कॅन्सचे प्रमुख रजनीकांत कोठारी, लेवा भातृ…

Read More

साईमत लाईव्ह कजगावं प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील पैलवान दामू सहदेव वाकोडे याने महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा पातळीवर विजय मिळवला त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. दामू वाकोडे हा कुस्तिगिर मल्ल अनेक दिवसांपासून कुस्त्यांचे आखाडे गाजवत असतो त्याने आता पर्यंत अनेक ठिकाणी विजय मिळवला शालेय स्तरावरील अनेक कुस्त्या त्याने जिंकल्या आहेत. तसेच यापूर्वी अनेक मानाच्या कुस्त्या त्याने जिंकून विजयश्री खेचून आणला आहे. आता त्याने महाराष्ट्र केसरी ची तयारी चालू केली आहे त्यात त्याने महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या निवड स्पर्धेत यश मिळवले व जिल्ह्यातून त्याची व अन्य स्पर्धकांची निवड झाली आहे. त्यामुळे आता दामू वाकोडे हा महाराष्ट्र केसरीच्या तयारीला लागला…

Read More

साईमत लाईव्ह कजगावं प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथून जवळच असलेल्या गोंडगाव येथे अध्यात्म शिरोमणी संत जगदगुरू जनार्दन स्वामींच्या ३३ व्या पुण्यमरणाचे आयोजन दिनांक २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत करण्यात आले होते. तब्बल आठ दिवस हा भव्यदिव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिनांक ५ रोजी कार्यक्रमाची सांगता असल्याने तब्बल एक लाख भाविक उपस्थित होते. कार्यक्रमात आठ दिवसात लाखो भाविकांनी कार्यक्रम स्थळी भेट दिली व परमपूज्य बाबाजींचे आशीर्वाद घेतले तब्बल आठ दिवस कथा प्रवचन आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संपूर्ण कार्यक्रम हा १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराजांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला आठ दिवसात अनेक वेळा शांतिगिरी महाराजांनी कार्यक्रम स्थळी भेट…

Read More

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी पंचवटी येथील कल्पदीप क्लासेस चा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. ‘महाराष्ट्राची संस्कृती’ या विषयावरील कार्यक्रम या स्नेहसंमेलनात सादर झाले. तसेच गुणीजन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.पंचवटी येथे गेल्या ९ वर्षांपासून कल्पदीप क्लास ज्ञानदानाचे कार्य करीत असून या क्लास मधून शिकलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदावर कार्यरत आहेत. सध्या क्लास मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून क्लास चे व नाशिक चे नाव उज्ज्वल करावे, असे क्लास चे संचालक स्थानिक मयूर जाधव व प्रितेश जाधव यांचे वडील यांनी यावेळी सांगितले. कल्पदीप क्लास च्या वार्षिक स्नेहसंमेलनास क्लास चे विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी लोकनृत्य, कोळी नृत्य व…

Read More

साईमत लाईव्ह कजगावं प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र गोंडगाव येथे अत्यंत बहुप्रतीक्षेत असलेल्या संत जगदगुरू जनार्दन स्वामी यांच्या ३३ व्या पुण्यस्मरणानिमित्त होत असलेल्या राष्ट्रनिर्मान धर्म सोहळ्याला आज २८ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे हा कार्यक्रम ५ डिसेंबर पर्यंत होणार आहे. सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम व उत्साहात ह्या बहुप्रतीक्षेत असलेल्या सोहळ्याला सुरुवात झाली जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडत आहे १००८ स्वामी शांतिगिरजी महाराज यांचे हेलिकॉप्टर द्वारे गोंडगाव नगरीत आगमन झाले अत्यंत वाजत गाजत ते कार्यक्रमस्थळी दाखल झाले सुरुवातीला हेलिकॉप्टर मधून कार्यक्रम स्थळाची पाहणी व…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी जरंडी ग्रामपंचायत च्या वतीने सोमवारी (दि.२८) श्रमदानातून खडकी नदीवर वनराई बंधारा उभारण्यात आला आहे.गावपरिसरात आगामी उन्हाळ्यात भूगर्भातील पाणी पातळी स्थिर राहावी यासाठी वनराई बंधारा उभारण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरूळे यांनी सांगितले गाव विकासा सोबतच जरंडी ग्रामपंचायत आता पाणी आडवा,पाणी जिरवा या शासनाच्या महत्वकांक्षी उपक्रमाकडे वळाली आहे. त्यासाठी खडकी नदीवर श्रमदानातून ग्रामस्थांनी उभारलेल्या वनराई बंधाऱ्याचे सोमवारी सरपंच वंदनाबाई पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी सरपंच वंदनाबाई पाटील, उपसरपंच संजय पाटील,ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील,मधुकर सोनवणे,प्रकाश पवार,अमृत राठोड, बनेखा तडवी,आदींची उपस्थिती होती ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरूळे, लिपिक संतोष पाटील,अनिल शिंदे आदींनी याकामी पुढाकार घेतला.

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव शहराजवळील गलवाडा(अ) शिवारात गट क्र-१४४ मधून अवैध उत्खनन करतांना दोन ट्रक्टर व एक जे सी बी रंगेहाथ पकडल्याची कारवाई महसूल च्या अवैध गौण खनिज पथकांनी रविवारी केली आहे या कारवाईत दोन्ही ट्रॅक्टर व जे सी बी सोयगाव तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले आहे.या कारवाई मुळे अवैध गौण खनिज वाहतूक दारांची धाबे दणाणले आहे. सोयगाव महसूलचे भरारी पथकाला गलवाडा(अ) शिवारातील गट क्र-१४४ मध्ये अवैध माती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदार रमेश जसवंत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक घटनास्थळी पोहचले असता,त्या ठिकाणी अवैध मातीचे जे सी बी च्या साहाय्याने उत्खनन सुरू असताना पथकांनी रंगेहात पकडून दोन ट्रॅक्टर…

Read More