साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी तालुक्यातील निंबायती येथील शेतकरी पुत्र गणेश कौतिक सुस्ते यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल निंबायती येथील कै. वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय येथे सत्कार करण्यात आला गणेश सुस्ते यांचे दहावी पर्यतचे शिक्षण हे याच विद्यालयात झाले. सत्कार प्रसंगी कै.वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक यशवंत चौधरी यांच्यासह विलास चौधरी,समाधान शेळके,संजय पाटील,दिनेश पाटील,लिपीक गजानन राठोड,सेवक ज्ञानेश्वर तेली, बेबीबाई राठोड , व विद्यार्थी उपस्थित होते.
Author: Saimat
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुक्यातील कंकराळा ग्रामपंचायत दिनांक 07 रोजी बिनविरोध जाहीर करण्यात आली , यावेळी गावाच्या ऐकी मुळे हा ऐतिहासिक निर्णय ठरला, यावेळी पुढीलप्रमाणे विजयी उमेदवार लोकनियुक्त सरपंच किशोर सोनवणे , ग्रामपंचायत सदस्य कुणाल राजपुत , हिरालाल ढाकरे , गोरख पवार , शाम पाटील , सुनिता उबाळे, निर्मला सोनवणे , सारीका हिवराळे अशाप्रकारे बिनविरोध निवड करण्यात आली , यावेळी गावातील उपस्थित चेअरमन देविदास राजपुत , तालुका प्रमुख दिलीप मचै , माजी सरपंच शिवदास राजपुत , रविंद्र पाटील, प्रविण कदम, ईश्वर श्रीरसागर, तिरुपती पतसंस्था चेअरमन रामदास राजपुत, भगवान राजपुत, संदीप गायकवाड,मोतीलाल वाघ , विठ्ठल बडकणे,संतोष राजपुत,जयेश पाटील ,किरण पाटील…
साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी कजगाव ता भडगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरत आहे अपेक्षेप्रमाणे इच्छुकांची संख्या पाहता ही निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते त्यामुळे आता माघारींनतर सर्वच चित्र स्पष्ट झाले असून एकूण ८५ दाखल अर्जांपैकी एकूण ४४ अर्ज माघार झाल्याने व एक अर्ज पात्र निकषात न बसल्याने व एक जागा बिनविरोध झाल्याने आता सतरा जागेसाठी चाळीस उमेदवार रिंगणात आहेत तर कजगाव लोकनियुक सरपंच साठीची निवडणूक चौरंगी होणार आहे. कजगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे पहिलेपासूनच संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकूण बारा उमेदवारांनी अर्ज भरले होत मात्र आठ उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक आता चौरंगी होणार…
साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी बोदवड महाविद्यालयाच्या गणित विभागाच्या 45 विद्यार्थ्यांनी नुकतीच अजिंठा लेणीला भेट दिली.या भेटीत विद्यार्थ्यांनी लेण्यांमधील अद्भुत सौंदर्य , चित्रे व शिल्पांच्या निरीक्षणासोबतच गणित,विज्ञानाच्या दृष्टीकोनातूही लेण्यांचा अभ्यास केला . त्यातून त्यांना आढळले की अजिंठालेणी दीर्घकाळ टिकावी , छताचे वजन पेलता यावे म्हणून एकसंध उत्कृष्ट घनता असलेल्या अश्या बेसाल्ट खडकात लेणी कोरतांना विविध स्तंभ,वेगवेगळे दरवाजे, निरनिराळया खिडक्या, हवेचे झरोखे, त्यांची संख्या,त्यांचा आकार ,त्यांची उंची, त्यांची जाडी ,स्तंभावरील दाब,वजन ,बल लक्षात घेऊन केलेली प्रमाणबद्धता घेतांना सखोल विचार केलेला आढळतो . तसेच लेणीमध्ये प्रकाश आत यावा ,हवेचे वायुविजन व्हावे ,योग्य तापमान राहावे ,पावसाच्या पाण्याची साठवण, यासांरख्या गोष्टींच्या त्याकाळात केलेल्या उपाययोजना बघून…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव तालुका हा १००% डोंगरीभाग असल्याने हा तालुका सोयगाव सिल्लोड विधानसभा मतदारसंघात जोडला गेला आहे तसेच या मतदारसंघासाठी दोन आमदार व दोन खासदार आहेत तरी त्या दृष्टीने सोयगाव तालुका विकासापासून कोसो दूर आहे, तसेच जिल्हा परिषदेचे तीन सदस्य असून एकूण सहा पंचायत समिती गण आहेत १/५ सर्कल कन्नड मतदार संघ,१/५ सिल्लोड मतदार संघ असल्यामुळे जि. प. सदस्यांचा निधी देखील खर्च करण्यास मतदारसंघात अडचण येत असते त्यामुळे विकासकामांना अडथळा येत असतो याप्रकारे तालुक्यातील परिस्थिती असल्यामुळे प्रशासनाला देखील अडचणीचा सामना करावा लागतो. तरी सोयगाव तालुका हा एकाच विधानसभा मतदारसंघात जोडावा अन्यथा पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती व विधानसभा…
साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी शहर व तालुक्यात सद्या अवैध वाळू वाहतुकीने जोर पकडला आहे. यावर अंकुश लागावा म्हणून रात्रभर महसूल प्रशासनाचे गस्ती पथक संपूर्ण तालुक्यात गस्त घालत असते. याचाच परिणाम म्हणून आज पहाटे पावणे सहा वाजता कारगील चौकातून शहरात प्रवेश करतांना एका अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या ट्रॕक्टरचा पाठलाग करत असतांना वेगात असलेले ट्रॕक्टर ट्रॉलीसह महावीर नगर नजीक पलटी झाले. ही घटना इतकी भयंकर होती की, या मध्ये टॕक्टर व ट्रॉली यांची चाके निघून पडली होती. व ट्रॉलीमधील वाळू रस्त्यावर पसरली. त्यामुळे पाठलाग करणाऱ्या पथकातील तलाठी संतोष कोळी हे किरकोळ जखमी झाले. त्यांना ताबडतोब उपजिल्हा रुग्णालयात नेत त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात…
साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी मलकापूर येथील रेल्वे लाईनचे काम करणारा ३२ वर्षीय खासगी कंत्राटदाराचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सकाळी कि.मी ४९२/३२ बाय १५ च्या मध्यभागी मेन डाऊन लाइनच्या बाजूला मलकापूर येथे घडली. मृत पावलेला खासगी ठेकेदार सुनील उद्रास कंगाले (रा. भातोडीया खुर्द, जिल्हा छिंदवाडा) हा सकाळी मलकापूर रेल्वेलाईन येथे काम करत असताना माघुन येणारी भरधाव रेल्वेचा आवाज आला नाही. त्यामुळे रेल्वे क्रमांक १२८७८(गरीब रथ) या धावत्या गाडीची धडक लागून गंभीर जखमी होऊन तो जागीच मरण पावला. याची माहिती शेगाव रेल्वे पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी व पंचनामा केला. मृतदेह हा मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता…
साईमत लाईव्ह चाळीसगांव प्रतिनिधी चाळीसगाव येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी च्या बी.पी.आर्ट्स,एस.एम.ए सायन्स अँड के.के.सी कॉमर्स कॉलेज आणि के.आर. कोतकर महाविद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर यांनी बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी तमाम भारतीयांच्यासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. बाबासाहेबांनी भारतीय समाजातील जात, धर्म, वर्ग, लिंग, आदी भेदांमध्ये अडकलेल्या समाजातील दरी नष्ट करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. खऱ्या अर्थाने मानवाच्या, माणुसकीच्या प्रस्थापनेसाठी अहोरात्र काम केले, लेखन केले. संविधानाचे निर्माण आणि लोकशाहीसाठी आग्रही राहून, न्याय, समता, समाज परिवर्तन, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समानता आणण्यासाठी समाज परिवर्तनाची…
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी येथील कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या संपर्क कार्यालयात राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सोयगांव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा आशाबी तडवी, गटनेते अक्षय काळे, नगरसेवक तथा शहर प्रमुख संतोष बोडखे,हर्षल काळे,गजानन कुडके, राजू दुतोंडे,लतिफ शहा, अमोल मापारी, संदीप सुरडकर, कदीर शहा, मंगेश सोहणी, किशोर मापारी, शेख बबलू आदींची उपस्थिती होती.
साईमत लाईव्ह फैजपूर प्रतिनिधी येथील मधुकर सहकारी साखर कारखाना विक्री झाला. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी मिळण्यासाठी साखर आयुक्त, कामगार आयुक्त, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक तसेच कारखान्याचे प्रशासक, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. मात्र या विषयी कोणताही विचार न करता जिल्हा बॅँकेने कारखाना विक्री केला. कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी मिळण्यासाठी दि. ४ डिसेंबर रोजी दुपारी मधुकर कारखान्याच्या सर्वच कामगारांची बैठक घेण्यात आली. त्यात कारखाना विक्री केल्यानंतर कामगारांची प्रलंबित देणी अद्यापही मिळाली नाही. त्याबाबत कामगारांशी कोणतीही चर्चा केली नाही. कामगारांना विश्वासात घेवून निर्णय व्हायला पाहिजे होते. कामगारांची…