जरंडी परिसरात बहरला बहुगुणी पिवळा पळस, जरंडी निंबायती रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे वेधून घेत आहे लक्ष

0
2
साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी
वसंत ऋतूची चाहूल लागताच डोंगर ,वन तसेच सोयगाव-बनोटी रस्तावरील बहरलेले पळसाची झाडे सर्वांची लक्ष वेधून घेतात ,सोयगाव तालुक्यातील जरंडी परिसरात तर बहुगुणी दुर्मिळ पिवळा पळस बहरला आहे ,हा पिवळा पळस अत्यंत दुर्मिळ असून औषधीसाठी या पिवळ्या फुलांचा उपयोग होत असल्याने या पळसाला विशेष महत्व आहे वसंत ऋतूत फुललेले हे पळसाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
लाल केसरी पळस फुले जंगलात सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळतात मात्र पिवळा पळस हा अत्यंत दुर्मिळ समजला जातो औषधीसाठी ही या फुलांचा उपयोग आहे असे तज्ञ सांगतात पिवळ्या अळसाबद्दल काही अंधश्रद्धा देखील प्रचलित आहेत गुप्तधन शोधण्यासाठी या फुलांचा उपयोग केला जातो त्यामुळे जादूटोणा करणारे तांत्रिक मांत्रिक नेहमीच या झाडाच्या शोधार्थ असतात पळस फुलांना “फ्लेम ऑफ फॉरेस्ट” अर्थात जंगलातील ज्वाला अशी इंग्रजांनी उपमा दिली आहे पळसाला जसा आकार नाही  तसेच त्याच्या आकर्षक फुलांना गंधही नाही परंतु फुललेला पळस सर्वांनाच आवडतो कारण पाऊस पडला की संपूर्ण जंगल लाल रंगाने बहरून निघते अशा बहुगुणी आणि त्याच्याकडे लक्ष जाताच पाहणाऱ्यांच्या डोळ्याला भुरळ घालणारा पिवळा पळस सध्या जरंडी परिसरात जरंडी -निंबायती रस्त्यावर बहरला असून येणारया जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here