गळ्यात कांद्याची माळ डोक्यावर कांदा टोपली घेऊन आमदार दिलीप बनकर यांचे विधानभवनासमोर आंदोलन

0
2

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी :-

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील कांदा भावात झालेल्या मोठ्या घसरणीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी गळ्यात कांदा माळ घालून व डोक्यावर कांदा भरलेली टोपली घेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर निषेधार्थ आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक जिल्हात मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन घेतले जाते नगदी पीक म्हणून शेतकरी कांदा पिकाकडे बघतो एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च करून शेतकरी .वर्षभराचे आर्थिक नियोजन करतात मात्र सद्या कांद्याला २ ते ५ रुपये असा कवडीमोल भाव मिळत असून उत्पादनासाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे शेतकऱ्यांना प्रतिएकरी ३०ते ४० हजार रुपये तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे .अक्षरशः निफाड तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या कांदा पिकावर रोटरी मारली.तर कांदा शेतात जनावरे सोडवा लागत आहे.

कांदा भावातल्या मोठ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीचे लिलाव बंद पाडले कांदा पिकाला प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान ,हमीभाव अश्या विविध शेतकऱ्यांच्या सातत्याच्या मागणी कडे राज्यसरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने सरकारचे कांदा प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी आपल्या इतर सहकारी आमदारासोबत गळ्यात कांद्याची माळ व डोक्यावर कांदा भरलेली टोपली घेऊन कांदा अनुदान जाहीर करावे अश्या घोषणा देत अर्थ संकल्पिय आदिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवनासमोर निषेधार्थ आंदोलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here