Author: Saimat

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी पाणी साठा मुबलक असताना सुद्धा नियोजन शून्य कारभारामुळे यावल शहरात सकाळी 2 वाजता पाणीपुरवठ्याची वेळ तसेच कचरा व साफसफाई अनियमित होत असल्याची तक्रार यावल शहर युवा सेने तर्फे करण्यात आली. यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दि.6 रोजी दिलेल्या निवेदनात यावल शहर युवा सेना प्रमुख सागर देवांग,शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,शहर उपप्रमुख योगेश राजपूत,सरचिटणीस विजय पंडित,शहर उपप्रमुख संतोष धोबी शिवसैनिक विवेक अडकमोल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल शहरात काही भागात सकाळी (रात्री) 2 वाजता पाणीपुरवठा केला जातो बऱ्याच भागातील नागरिक हे गाढ झोपेत असतात त्यामुळे या नागरिकांना एवढ्या रात्री पाणी भरणे शक्य होत नाही,त्यामुळे सुमारे दोन तास…

Read More

साईमत लाईव्ह प्रतिनिधी वडापाव हा सर्वसामान्य ते सेलेब्रिटीपासून सगळयांचा एकदम आवडता पदार्थ आहे .आणि आजच्या दैनंदिन जीवन चालत बोलता खातायेणार एकदम सोपा पदार्थ म्हणजे वडापाव, आज हा पदार्थ देशात सर्व ठिकाणी मिळतो, आणि आता या वडापाव मध्ये किती न काई नवीन प्रकार लोक आता बनवायला लागले. पण तुम्हाला माहित आहे का या वडापाव चा जन्म कुठे झाला व कोणी केला. चला त मग जाणून घेऊया वडापाव चा जन्म कसा झाला व कोणी केला. वडापावचा जन्म हा मुंबईत अशोक वैद्य यांच्या सुपीक डोक्यातून १९६६ मध्ये झाला. दादरच्या स्टेशनजवळ चाळीमध्ये राहणाऱ्या अशोक वैद्य यांनी १९६० साली वडे , पोहे विकण्याचे दुकान सुरु…

Read More

साईमत लाईव्ह कजगाव प्रतिनिधी भडगाव येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिना निमित्त भडगांव येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे आज दि.६ रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा व व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल तहसिलदार मुकेश हिवाळे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे,कृषी अधिकारी बी.बी.गोर्डे, महिला दक्षता समिती अध्यक्ष योजनाताई पाटील, यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल व तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यानंतर…

Read More

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी (प्रविण चौरे) गुटका विक्रीस शासनाने बंदी घातलेली असताना ही ओझरला मात्र पोलिसांच्या आशिर्वादाने  गुटका विक्री जोरात सुरू असुन अव्वाच्या सव्वा दराने घुटका विक्री  करणारे जोमात आहे. गुटख्यावर शासनाने बंदी घातलेली आहे तसेच नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैद्य धंदे बंद केलेले असताना ओझर गांवात मात्र  गुटका, मावा यासारखे नशा येणारे पदार्थ सर्रास मिळत असुन पानटपरी, छोटे चहाचे स्टॉल्स व जनरल स्टोअर्स यांच्यासोबत आता किराणा दुकानातही गुटखा उपलब्ध होत असल्यामुळे   ओझरमध्ये बंदी कागदावरच असुन गुटकाविक्री बेकायदेशीर रित्या जोमात सुरू आहे. शासनाचे ओझर मधील पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभाग…

Read More

साईमत लाईव्ह भडगाव प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन विद्यार्थिनीचा तिघांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संदर्भात अधिक असे की, दि. ४ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पिडीता बसस्टॅड जवळील वडिलांच्या दुकानावर असतांना भूषण नामदेव पाटील, जीवन प्रभाकर चव्हाण, चेतन रवींद्र पाटील (तिघं रा. कजगाव) या तिघांनी दुकानावर येत पिडीत मुलीशी अश्लिल संवाद साधत अंगलट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तिघांविरुद्ध पिडीत विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव प्रतिनिधी सोयगाव येथे कै.बाबुरावजी काळे स्कूल मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी श्री रंगनाथ आढाव ,केंद्र प्रमुख फिरोज तडवी, संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री डॉ. शिरिष पवार, उपप्राचार्य डॉ रावसाहेब बारोटे ,कठोरे सर ,बावचे सर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर एलीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात तालुक्यातील एकुण 24 शाळांनी सहभाग नोंदवला होता या प्रदर्शनात माध्यमिक गटातुन कै.बाबुरावजी काळे स्कूल च्या निकिता पाटील, प्राची पाटील, धनश्री वाघ या विद्यार्थींनींनी प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थांनींचे संस्थेचे अध्यक्षा ज्योती ताई रंगनाथ काळे, सचिव देवीना रंगनाथ काळे, ज्ञानज्योती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेश यादव शाळेचे…

Read More

साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी मोबाईलमधील गाण्यांचा आवाज हळू कर तसेच व्यवस्थीत टिकीट घे बोलल्याचा राग आल्याने एका तरुणाने महिला महिला बस कंडक्टरसह भांडण सोडविण्यास आलेल्या बस चालकाला देखील मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी रतीक जुलाल बागुल (वय २३, रा. पिंप्री ता. चोपडा) या तरुणाला अडावद पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात ४५ वर्षीय महिला कंडक्टरने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ४ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कमळगाव बस स्थानकावर बसमध्ये बसल्यावर रतीक बागुल हा तरुण महिला कंडक्टरकडे बघून मोबाईलमध्ये जोर-जोराने गाणी वाजवत होता. महिला कंडक्टरने आवाज कमी कर, असे रतिकला सांगितले. तरी…

Read More

साईमत लाईव्ह भडगाव प्रतिनिधी भडगाव  तालुक्यातील कजगाव येथील अवैध धंद्याच्या बाबतीत तक्रारी अर्ज दिल्यामुळे चौघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी भडगाव पोलिसात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक असे की, एका २६ वर्षीय तरुणाने कजगावातील अवैध धंद्यांबाबत तक्रारी अर्ज दिला होता. यामुळे पीनू महाजन, राजू चव्हाण, विजू चव्हाण, धर्मा माळी (पूर्ण नाव माहित नाही, सर्व. कजगाव ता. भडगाव) या सर्वांनी मिळून दि. ४ जानेवारी रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास कजगाव बस स्थानकाजवळील धनश्री कॉम्प्लेक्स मधील एका झेरॉक्स दुकानाजवळ पिडीत तरुणाला अवैध धंद्या बाबत तक्रारी अर्ज दिल्याचा…

Read More

Central Railway Recruitment 2023 : तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच आहे. मग भारतीय रेल्वेत नोकरीची करण्याचं स्वप्न असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय रेल्वेने देशभरात 10वी पास उमेदवारांसाठी जवळपास 2422 जागांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) ने मध्य रेल्वेच्या अंतर्गत अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आपला अर्ज दाखल करु शकतात. भारतीय रेल्वेच्या rrccr.com या अधिकृत वेबसाईटवरुन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज दाखल करु शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जानेवारी 2023 आहे. तसेच https://rrccr.com/Home/Home या लिंकवर क्लिक करुन तुम्ही…

Read More

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी राज्यात अमृत महाआवास अभियानाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील सर्व लाभार्थींना घरे मिळणार आहेत. या अभियानात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून गतिमानतेने व गुणवत्तापूर्ण, दर्जेदार घरांची निर्मिती होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य शासनाच्या योजनांतून 13.14 लाख घरकुले पूर्ण करण्यात आली असून 5.61 लाख घरे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये राज्याला आतापर्यंत 14.26 लाख उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्यापैकी 13.60 लाख (95%) मंजुरी दिली आहे. उर्वरित लाभार्थींच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मंजूर घरकुलांपैकी 9.48 लाख घरकुले विविध योजनांच्या कृतीसंगमातून…

Read More