दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ चोपड्यात आपचे निवेदन

0
3

साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी

येथील आम आदमी पार्टीच्या वतीने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ तहसिलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले आहे. मनिष सिसोदिया यांची अटक म्हणजे भाजपने सूडबुद्धीने केलेली कारवाई असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

    सर्वसामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तर अशीच गळचेपी सुरू राहणार असली तर देशभर इंकलाब करण्याचा इशारा देखील आम आदमी पार्टीच्या वतीने  देण्यात आला आहे. सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्यावर कारवाई करत त्यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. त्या आधी तब्बल आठ तास मनीष सिसोदिया यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईची आम आदमी पार्टीकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
  मी तपासात पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचे प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. मला काही महिने तुरुंगात राहावे लागले तरी मला पर्वा नाही. देशासाठी ज्या भगतसिंहांना फाशी देण्यात आली, त्यांचा मी अनुयायी आहे. अशा खोट्या आरोपांमुळे तुरुंगात जाणे ही छोटी गोष्ट आहे.’ असे ट्वीट मनीष सिसोदिया यांनी अटकेपूर्वी केले आहे.
    सदर निवेदनावर आपचे जिल्हा उपसंयोजक विठ्ठलराव साळुंखे, चोपडा तालुका संयोजक राजेंद्र पाटील, तालुका उपसंयोजक समाधान बाविस्कर, शहर संयोजक इंजि. सुधीर पाटील, शेख जलील अहमद अय्युब, शशिकांत पाटील, संतोष राठोड , संजय बंजारा, रमेश देशमुख, इम्रान मलिक, कामरान सय्यद, विकास पाटील आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here