साईमत पुणे प्रतिनिधी राज्य मंडळ दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार या कडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले होते. त्यानुसार आता राज्य मंडळाकडून गुरुवारी (२५ मे) बारावीचा निकाल दुपारी दोन वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. निकालानंतर लगेचच राज्य मंडळाकडून श्रेणीसुधार परीक्षेची अर्ज प्रक्रियाही सुरू केली आहे. त्या बाबतची माहिती राज्य मंडळाने जाहीर केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी, तसेच आपली श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची आणखी एक संधी दिली जाते. त्यानुसार जुलै-ऑगस्टमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीची श्रेणीसुधार परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ मे पासून सुरू केली जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव…
Author: Saimat
तुका म्हणे एक मरणीच सारे उत्तमची उरे कीर्ती मागे ! स्व. सौ. ललिताताई राजेंद्र बलदोटा (वय 57) एक शांत, संयमी, सहनशील, प्रेमळ व्यक्तिमत्त्व 27/4/2023 रोजी संथरा व्रतातून स्वर्गवासी झाले. पती राजेंद्र व मुलगा रोहित यांनी आधुनिक उपचारांनी प्रयत्नाची परकाष्टा करूनही यश आले नाही. मेंदूतील रक्तवाहिनीच्या गाठीनी त्यांना अकाली जावे लागले.त्या देहाने गेल्या परंतु कर्माने मरावे परी कीर्ती रूपाने उरावे या संत युक्तीने अमर झाल्या. पाटोदा जि. बिड येथील किसनलाल संचेती व माता स्व. रामकुवरबाई यांच्या पोटी 19/9/1966 जन्म घेतलेले हे कन्यारत्न जेष्ठ बंधू कांतीलाल, अभय आणि दिलीप व तसेच छोटी बहिण वंदना यांच्या बरोबर लहानाची मोठी होऊन पुणे येथे नातेवाईकांकडे…
साईमत मुंबई प्रतिनिधी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची विचारपूस करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णलयात दाखल झालेत.कालपासून मनोहर जोशी यांना बरे वाटत नव्हते. त्यामुळे हिंदुजा रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक म्हणून मनोहर जोशी यांची ओळख आहे. गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते.काल संध्याकाळी मनोहर जोशी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.त्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. मनोहर जोशी यांची…
साईमत यावल प्रतिनिधी येथील रामेश्वर कॉलनीतील रहिवासी इंदुबाई हरी सपकाळे (वय 72) यांचे आज दि.22 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि. 23 रोजी सकाळी 9 वाजता राहत्या घरुन मेहरुण स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या सुनिल व सतिष सपकाळे यांच्या आई तर अनिल व अरुण सपकाळे यांच्या काकू होत.
साईमत जळगाव प्रतिनिधी तालुक्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस तर्फे काँग्रेस भवनात तालुकाध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अविनाश राजू सोनवणे, विलास कैलास सोनवणे, युवराज दौलत झाल्टे सुधाकर प्रल्हाद सोनवणे संजय दत्तू पाटील, दिलीप घोलप, संदीप सुरवाडे, समाधान सोनवणे, संतोष सुरडकर, विजय रूपचंद सोनवणे, आकाश संजय मेंढे, किशोर रामकृष्ण वानखेडे, किशोर सोमा सपकाळे, सतीश माणिक इंगळे व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, नुकत्याच…
साईमत बोदवड प्रतिनिधी तालुक्यातील उजनी दर्ग्यासमोरून दुचाकी लंपास केल्याची घटना १८ मे रोजी घडली आहे. तालुक्यातील उजनी दर्ग्या समोरील चिंचेच्या झाडाखाली वराडसिम येथील शेख सादिक शेखर रसुन मण्यार यांनी त्यांच्या मालकीची लाल रंगाची मोटरसायकल (एम एच १९ सिटी ३२५३) १८ मे रोजी लावली होती. मात्र पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी येवून पाहिले असता मोटरसायकल गायब होती. त्यांनी परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही. याप्रकरणी शेख सादिक मण्यार यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शशिकांत महाले करीत आहे.
साईमत जळगाव प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील उन्हाळी परीक्षांचे बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. या तीन वर्षीय अभ्यासक्रमांचे निकाल प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षात मिळालेल्या गुणांची टक्केवारी विचारात घेवून निकाल जाहीर केले जाणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व विद्यापीठांमध्ये पदवी प्रदान करण्याच्या पध्दतीमध्ये एक वाक्यता आणण्याच्या दृष्टीने सर्व विषयांचे एकत्रित गुण मिळवून पदवी प्रदान करावी. केवळ शेवटच्या वर्षातील दोन सत्रांचे गुण किंवा द्वितीय व तृतीय वर्षातील सर्व सत्रांचे गुण मिळून पदवी न देता संपूर्ण कालावधीतील सर्व सत्रांचे गुण विचारात घेतले जावेत असे आदेश दिले होते. याबाबत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने ठराव देखील मंजूर केला होता. त्याची…
साईमत जळगाव प्रतिनिधी रणरणत्या उन्हात भीषण पाणीटंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. यापार्श्वभुमीवर गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी तिघ्रे गावात पाणीटँकर पाठवून नागरिकांची तहान भागविली. भीषण पाणीटंचाईमुळे तिघ्रे गावातील रहिवाशांना पिण्याचे पाणी देखील मिळणे कठीण झाले होते, अशा परिस्थीतीत डॉ.उल्हास पाटील यांनी सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून स्व:खर्चाने पाण्याचे टँकर पाठविले. गावात पाण्याचे टँकर येणार ही माहिती मिळताच तिघ्रे वासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी टँकरभोवतील कुटूंबातील पुरुष, महिला, मुले यांनी गर्दी केली. याबद्दल तिघ्रे गावकर्यांनी डॉ.उल्हास पाटील यांचे आभार मानले.
साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनीरिंगच्या सायन्स आणि हुम्यानिटिज विभागातर्फे विध्यार्थानसाठी सामूहिक ध्यान साधनेचे आयोजन करण्यात आले होते. सहजयोग ध्यान केंद्राचे धीरज संगीत, संध्या पाटील, रुपाली चौधरी, श्री.दांडगे, चंदु पाटील आणि अविनाश सावळे यांच्या मार्गदर्शनात या कार्यशाळेत योग, ध्यान साधना आणि विध्यार्थी जीवनात होणारा फायदा या विषयी प्रात्यक्षिक द्वारे समजावण्यात आले. या कार्यशाळेत प्रथम, द्वितीय वर्ष अभियांत्रिकीच्या विधार्थ्यानी सहभाग नोंदवला. शैक्षणिक जीवनात ध्यान साधना एकग्रेसाठी लाभ प्राप्त करून देते व विचार सरणीत बदल घडतो असे मत विध्यार्थानी व्यक्त केले. कार्यशाळेसाठी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, उपप्राचार्य संजय दहाड आणि शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रज्ञा विखार, विभाग प्रमुख किरण…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून झालेल्या अंकेक्षणातून ” अ “दर्जा प्रदान करण्यात आला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्याकडून दर तीन वर्षासाठी शैक्षणिक अंकेक्षन केले जाते. त्याप्रमाणे महाविद्यालयाने तीन वर्षाची कामकाजाची संपूर्ण माहिती विद्यापीठाकडे ऑनलाइन अर्ज करून पाठविले होती. अनेक बाबींची माहिती महाविद्यालयाने विद्यापीठाला सादर केली होती. विद्यापीठाने संपूर्ण माहितीची खात्री करून महाविद्यालयाला ” अ “दर्जा प्राप्त असल्याचे कळविले. महाविद्यालयाचा शैक्षणिक व गुणात्मक आलेख उंचावण्यासाठी कर्मवीर शिक्षणमहर्षी नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण यांचे आशीर्वाद तसेच संस्थेचे चेअरमन डॉ. विनायक चव्हाण, संस्थेचे सचिव बाळासाहेब चव्हाण, संस्थेचे…