300 कोटी थकल्याने पालकमंत्र्यांना सोबत घेत  कंत्राटदार मुख्यमंत्र्यांना भेटले; बहिष्कार कायम

0
2
साईमत जळगाव प्रतिनिधी

सरकारी कामे करणाऱ्या जिल्ह्यातील कंत्राटदारांचे सुमारे 300 कोटी थकल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सोबत घेत जिल्ह्यातील कंत्राटदारांनी नुकतीच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली . तथापि जिल्ह्यात नव्याने मंजूर झालेल्या 280 कोटी रूपये खर्चाच्या कामांवरील बहिष्कार या कंत्राटदारांच्या संघटनेने कायम ठेवलेला आहे.
   कंत्राटदारांनी नव्या कामांवर टाकलेल्या या बहिष्कारामुळे गेल्या दीड महिन्यात जिल्हयातील सगळी कामे ठप्प झालेली आहेत.  या कामांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करताना कंत्राटदारांनी थकबाकीच्या मागणीसाठी आधी लाक्षणिक उपोषणही केले होते. या उपोषणकर्त्या कंत्राटदारांची भेट घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाठील यांनी या समस्येबद्दल नाराजीही व्यक्त केली होती.
निधी वाटपात कसा अन्याय झाला व त्यामुळे कंत्राटदारांची बिले कशी थकली, या मुद्यावर कंत्राटदारांनी या भेटीत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. आमदार राजूमामा भोळे यांनी या मु्‌‍द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना कंत्राटदारांच्या बहिष्कारासह सर्व हकीकत सांगितली व तात्काळ कंत्राटदारांना थकबाकी मंजूर करण्याचीही मागणी केली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह कंत्राटदारांसोबत यावेळी आमदार संजय सावकारे, राजूमामा भोळे, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील या चर्चेत सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here