१०वी उत्तीर्णांसाठी रेल्वेत नोकरीची संधी

0
8

साईमत नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-

दक्षिण पूर्व रेल्वेने( South Eastern Railway) ॲपरेंटिस पदांसाठी भरती सुरू केली आहे. रेल्वेकडून(Railway) नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक तरुण रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. या भरतेीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ३ मेपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जून आहे.

रेल्वेच्या अधिसूचनेनुसार, या भरतेीच्या माध्यमातून दक्षिण-पूर्व- मध्य रेल्वेत ॲपरेंटिसच्या ५४८ रिक्त पदांसाठी भरती होत आहे. यामध्ये साधारण गटांसाठी २१५ , ईडब्ल्यूएससाठी ५९, ओबीसींसाठी १४८, एससींसाठी ८५ आणि एसटी उमेदवारांसाठी ४१ पदे आरक्षित आहेत.
रेल्वेत ॲपरेंटिस भरतेीसाठी अधिकाधिक वय २४ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून १०वी पास व संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या दोन्ही परीक्षेत मिळालेल्या मार्क्सच्या आधारांवर उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. नंतर नियुक्ती झालेल्या उमेदवारांना एका वर्षाच्या ॲपरेंटिसपदाच्या ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येईल. या उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार स्टायपेंट दिले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here