साईमत थिरूवनंतपुरम् (वृत्तसंस्था)- दहशतवादी कट असलेल्या कथानकावर आधारित चित्रपट ‘केरला स्टोरी’ सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट केवळ एका राज्यातल्या दहशतवादी कटांवर आधारित आहे. केरळ हे देशातलं सुंदर राज्य आहे. केरळमधले लोक परिश्रमी आणि प्रतिभावान आहेत. परंतु त्याच केरळमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी कटाचा खुलासा या चित्रपटाने केला आहे, असे भाष्य आज पंतप्रधशन मोदी यांनी आज केले. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद सुरू झाला आहे. केरळ सरकारने या चित्रपटाला संघ आणि भाजपाचा प्रोपगंडा करणारा म्हटलं आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून काँग्रेसकडूनही सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटावरून वाद सुरू असताना भाजपाकडून सातत्याने या चित्रपटाचं आणि त्यात दाखवलेल्या घटनांचं समर्थन केलं…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेमार्फत बौध्द पौर्णिमे निमित्त दान परमिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्ञानस्त्रोत केंद्राचे माजी संचालक डॉ. अनिल चिकाटे उपस्थित होते. प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु.पगारे यांनी अभिधम्म:चर्चा व चिंतन या विषयावर विचार मांडले. बौध्द धम्मात दानाला महत्व असल्याने डॉ.म.सु.पगारे लिखित ग्रंथ यावेळी विविध विभागांना देण्यात आले. डॉ. पगारे आपल्या भाषणात म्हणाले की, कुठल्याही मोहाची अपेक्षा न ठेवता आपण जे ज्ञानदान करतो ते मनाला समाधान देणारे असते. अभिधम्मपिटकामध्ये चित्त, निब्बाण,चेतसिका व शिल यांना महत्व आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पारधे यांनी केले. बौध्द…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी.बेंडाळे महिला महाविद्यालयातील फोटोग्राफी-व्हिडिओग्राफी व फिल्म आणि ड्रामा विभागातील विद्यार्थ्यांनी नियोजित केलेल्या “वर्तुळ” या लघुचित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौरी राणे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी डॉ. व्ही. जे. पाटील, प्रा. पी. एन. तायडे, प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. संजय रणखांबे, प्रा. अशोक पाटील, प्रा. दीपक किनगे, प्रा. विनोद नन्नवरे, प्रा. सुचित्रा लोंढे तसेच फोटो व व्हिडिओग्राफी विभाग प्रमुख प्रा. राज गुंगे उपस्थित होते. या संपूर्ण लघुपटाचे चित्रीकरण, संकलन, ध्वनीमुद्रण हे विभागाचे विद्यार्थी करत आहेत. चित्रपट क्षेत्रात खांदेशचा सहभाग वृद्धींगत व्हावा या उद्देशाने महाविद्यालयात हा विभाग सुरु करण्याचा हेतू साध्य होताना दिसत आहे…
साईमत जळगाव प्रतिनिधी सरकारी कामे करणाऱ्या जिल्ह्यातील कंत्राटदारांचे सुमारे 300 कोटी थकल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सोबत घेत जिल्ह्यातील कंत्राटदारांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली . तथापि जिल्ह्यात नव्याने मंजूर झालेल्या 280 कोटी रूपये खर्चाच्या कामांवरील बहिष्कार या कंत्राटदारांच्या संघटनेने कायम ठेवलेला आहे. कंत्राटदारांनी नव्या कामांवर टाकलेल्या या बहिष्कारामुळे गेल्या दीड महिन्यात जिल्हयातील सगळी कामे ठप्प झालेली आहेत. या कामांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करताना कंत्राटदारांनी थकबाकीच्या मागणीसाठी आधी लाक्षणिक उपोषणही केले होते. या उपोषणकर्त्या कंत्राटदारांची भेट घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाठील यांनी या समस्येबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. निधी वाटपात कसा अन्याय झाला व त्यामुळे…
साईमत सोयगाव प्रतिनिधी वातावरणाच्या चढ-उतारामुळे तसेच बदलत्या हवामान बदलामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरिपपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. वादळी पावसाने काही शेतकऱ्यांच्या शेतात अजून मका, ज्वारी, बाजरी हे रब्बी चे पिके उभी आहेत तर काही शेतकऱ्यांच्या पिकांची कापणी होऊन शेतात पडलेली आहेत तालुक्यात गेल्या वर्षीच्या कापूस बाजार भाव वाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कपाशी परदड वर भर दिला होता मात्र शेतकऱ्यांना मागच्या वर्षाच्या तुलनेत या हंगामात कमी भावात कापूस विकावा लागला तर काही शेतकऱ्यांनी भाववाढ होईल या आशेवर कापूस घरात साठवून ठेवला आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. खरीप पूर्व हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांना शेतीकाम उरकून घेण्याची घाई…
साईमत जळगाव प्रतिनिधी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काल दुपारी नेरी नाका स्मशानभूमीजवळील अतिक्रमीत घरांवर धडक कारवाई केली. यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाला रहिवाशांनी जोरदार विरोध केला. मात्र विरोधाला न जुमानता पथकाने अतिक्रमीत पक्क्या घरांवर जेसीबी चालवून ही घरे पाडली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेरी नाका परिसरातील अतिक्रमीत घरे पाडण्यासाठी मनपाचे पथक आले असतांना रहिवाशांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र शनिपेठ पोलिसांच्या बंदोबस्तामुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. अखरे जेसीबीच्या मदतीने अतिक्रमीत केलेली घरे व कंपाऊंड तोडण्यात आल्याचे वृत्त आहे.
साईमत नशिराबाद प्रतिनिधी महामार्ग क्र. 6 वर बिजपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या तब्बल 216 टायरच्या महाकाय ालाने जलद गती महामार्गाला अक्षरश: 5 ते 6 तास मोगरी लावली होती. दरम्यान रात्री 9 वाजेच्या सुमारास महामार्ग पोलिसांसह नशिराबाद पोलिस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमाने वाहतूक सुरळीत केली. महामार्ग क्रं. 6 हा चौपदरी झाल्याने या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात भली मोठी असणारी अवजड वाहने ये-जा करीत आहेत. मुंबईहून नागपूरकडे जाणारा सोयीचा मार्ग म्हणून या महामार्गाकडे वाहतूक चालक पहात असतात. आज दुपारच्या सुमारास बिसपूरहून मुंबईकडे जाणारा इलेक्ीक टर्बाईन या महाकाय ाला भुसावळहून जळगावकडे जात असतांना टोल नाक्यानजीक रेल्वे उड्डाण पुलाजवळ वळणाच्या रस्त्यावर खोळंबला. हा ाला तब्बल 125 फूट लांबीचा…
साईमत शिरपूर प्रतिनिधी शहर पोलिसांनी वन जमिनीवरील गांजा शेतीवर कारवाई करीत तब्बल ५ लाख ८६ हजार रुपये किमतीची २९३ किलो गांजाची झाडे हस्तगत केली आहेत. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित फरार आह . शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांना दिनांक २ रोजी गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली होती. त्यानुसार नटवाडे शिवारात हरचंद जोगी पावरा रा. नटवाडे याने त्याच्या वन जमीनीवरील शेतात गांजा ची लागवड करून बेकायदेशीररित्या शेती करीत आहे. त्यावरून आगरकर यांनी छापा कारवाईची परवानगी घेऊन त्यानुसार छापा कारवाईकामी नायब तहसीलदार रविंद्र कुमावत, दोन शासकीय पंच, वजनकाटाधारक, फोटोग्राफर तसेच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस…
साईमत सोयगाव प्रतिनिधी सोयगाव येथील हृषिकेश विष्णु बागले ( वय २५ ) हा महावितरण विभागात कंत्राटी कामगार पद्धतीने काम करीत असणारा हृषिकेश हा दि.३० रोजी सोयगाव शहरातील वाल्मीक मंदिर परिसरातील वादळी वाऱ्यामुळे खांब वाकून तुटलेल्या तारा सरळ करण्यासाठी विद्युत खांबावर चढून दुरुस्ती करित असताना खाली पडून गंभीर जखमी झाला होता त्यास जळगांव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता दि.३ बुधवारी सकाळी १०.५५ ला त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी ६ वाजता सोयगाव येथील स्मशान भूमीत त्याचेवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, मोठा भाऊ व वहिनी असा परिवार आहे.लाईट च्या कामामुळे सर्वांना परिचित असलेल्या ऋषिकेश च्या मृत्यूमुळे…
साईमत शिरपूर प्रतिनिधी शिरपूर शहरासह तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांची संख्या वाढत आहे.तसेच या परिसरात त्यांची दादागिरी ही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे वृत्त तहसीलदार महेंद्र माळी यांच्या कानावर येत होते त्यानुसार तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले त्यानुसार योग्य ती कार्यवाही करत अवैध वाळू उपसा होणार नाही याची दक्षता घेत आहेत. त्याकरिता आज एका महिला तलाठी स्वाती वाघ यांनी दबंग गिरी दाखवत शिरपूर कोर्टाजवळ अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅकटर पकडले आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. याबाबत माहिती अशी की, ३ रोजी सकाळी ११ सुमारास तापी नदीतुन अवैध गौणखनिज वाहतूक करत असल्याचे…