वन जमिनीवरील गांजाची शेती उध्वस्त ; पोलिसांची कारवाई

0
1

साईमत शिरपूर प्रतिनिधी

शहर पोलिसांनी वन जमिनीवरील गांजा शेतीवर कारवाई करीत तब्बल ५ लाख ८६  हजार रुपये किमतीची २९३ किलो गांजाची झाडे हस्तगत केली आहेत. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित फरार आह

.
शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांना दिनांक २ रोजी गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली होती. त्यानुसार नटवाडे शिवारात  हरचंद जोगी पावरा रा. नटवाडे  याने त्याच्या वन जमीनीवरील शेतात गांजा  ची लागवड करून बेकायदेशीररित्या शेती करीत आहे. त्यावरून  आगरकर यांनी  छापा कारवाईची परवानगी घेऊन त्यानुसार छापा कारवाईकामी  नायब तहसीलदार रविंद्र कुमावत, दोन शासकीय पंच, वजनकाटाधारक, फोटोग्राफर तसेच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रं. ३ वरील सुळे फाट्याचे पुढे नटवाडे शिवारात जाऊन शोध घेतला.यात हरचंद जोगी पावरा  याचे वनजमिनीचे शेतात छापा टाकला असता त्या शेतात भुईमुंगाचे पिकात टिकटिकाणी गांजासदृश्य अंमली पदार्थाचे वनस्पतीच्या झाडांची लागवड करुन शेती केलेली दिसली. हरचंद शेतात मिळून आला नाही.

हरचंद पावरा यांच्या शेतातून २९३ किलो गांजाची ५ लाख ८६ हजार ६०० रुपये किंमतीची झाडे जप्त केली. पोहेकॉ  ललित पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ कलम २० व २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि किरण बाऱ्हे करीत आहेत. हरचंद पावरा फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक  संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक  किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर, पोउनि  किरण बाऱ्हे, पोउनि गणेश कुटे, पोहकों ललित पाटील, पोकों योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, विनोद अखडमल, गोविंद कोळी, मुकेश पावरा, प्रविण गोसावी, सचिन वाघ, भटू साळुंखे, उमाकांत वाघ, होमगार्ड मिथुन पवार, चेतन भावसार, शरद पारधी, राम भिल व भाऊसाहेब ठाकूर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here