साईमत शिरपूर प्रतिनिधी
शिरपूर शहरासह तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांची संख्या वाढत आहे.तसेच या परिसरात त्यांची दादागिरी ही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे वृत्त तहसीलदार महेंद्र माळी यांच्या कानावर येत होते त्यानुसार तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले त्यानुसार योग्य ती कार्यवाही करत अवैध वाळू उपसा होणार नाही याची दक्षता घेत आहेत. त्याकरिता आज एका महिला तलाठी स्वाती वाघ यांनी दबंग गिरी दाखवत शिरपूर कोर्टाजवळ अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅकटर पकडले आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.
याबाबत माहिती अशी की, ३ रोजी सकाळी ११ सुमारास तापी नदीतुन अवैध गौणखनिज वाहतूक करत असल्याचे ट्रॅक्टर दिसून आले. वाहतुक करणाऱ्या चालकास पथकाने विचारणा केली असता, रेती अवैधरित्या वाहतुक करण्याच्या उद्देशाने जातांना दिसून आले या प्रकरणी चालकाकडे रेती वाहतुकीबाबत कोणतेही परवानगी नसतांना बेकायदेशीर वाहतुक करीत असल्याचे पथकास निदर्शनास आले त्यानंतर ट्रॅक्टरसह चालकासह तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले.
त्यानंतर पंचनामा करून कारवाई करण्यात आली.
याप्रसंगी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर शारदा बागले मंडळ अधिकारी ए.ए.भामरे,पी.पी.ढोले तलाठी स्वाती वाघ,पूजा मस्के,पंकज महाले, विलास नागलोद,आदीच्या पथकाने ही कार्यवाही केली.