साईमत पुणे प्रतिनिधी मान्सून यंदा वेळेत दाखल होणार आहे. त्यामुळे बळीराजा देखील आता वरुणराजाची आतुरतेने वाट पाहत आहे. स्कायमेटचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यात लवकरच मान्सून येईल, असे संकेत मिळालेत. कोकणात 27 मे ला मान्सूनपूर्व पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. 5 ते 7 जून दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात, निकोबार बेटांवर, दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले आहे. आता बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सून पोहचला आहे. पुढील 3-4 दिवसात पाऊस पुढे सरकण्याची शक्यता आहे. उष्णकटिबंधीय वादळ आले…
Author: Saimat
संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन येत्या रविवारी होत आहे परंतु सरकार पक्ष आणि विरोधक यांच्यात सभागृहात वाद होण्याऐवजी बाहेरच सुरू झाल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. या नव्या इमारतीचे उद्घाटन कोणी करावे? हा वादाचा मुख्य मुद्दा दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करतील,असे सरकारतर्फे आधीच जाहीरही करण्यात आले आहे.सध्या मोदी म्हणजेच सरकार अशी स्थिती असल्याने त्यांंनी निर्णय घेतल्यावर तो आपोआपच सरकारी निर्णय होतो.त्यास विरोध कोण करणार?भारतीय जनता पक्षातील एकाही नेत्याची,खासदार-आमदार यांची तशी हिंमतही नाही. त्यानंतर उरले राजकीय विरोधक. देशात लोकशाही धोक्यात असल्याचे सांगितले जात असले तरी विरोधकांना मोदी किंमत देत नाहीत.त्यांच्यात ‘राष्ट्रीयत्वाची भावना…
साईमत जळगाव प्रतिनिधी आंतर जिल्हा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा शिरपूर(ता.धुळे)येथे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे 25 मे पासून खेळवल्या जाणार असून या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा 14 वर्षातील मुलांचा संघ निवडण्यात आला. त्या संघाला आज जिल्हा क्रीडा संकुल येथे एका छोटेखानी समारंभातून निरोप देण्यात आला. संघात यांची झाली निवड कर्णधारपदी अनुभूती शाळेचा आयुष भोर तर उपकर्णधारपदी अमळनेरच्या सैय्यद अलतमशची निवड करण्यात आली. ध्रव भुजवाणी, तुषार गुजर, ॠषिकेश परदेशी, कौशतुब महाजन, ताबीश खान, देवेंद्र पाटील, अनय रडे ( सर्व जळगाव) सुशांत गायकवाड,आदित्य जोशी, प्रतीक सराफ, रयान रोस, आशुतोष मिश्रा, कलश गवले, लोकेश पाटील ( सर्व भुसावळ). मारूफ खान, सैय्यद अलतमश, कुणाल देवकाते (सर्व…
साईमत चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव रेल्वे स्थानक हे तीन जिल्ह्याच्या सीमेवर असून येथून अनेक प्रवासी प्रवास करतात मात्र पाहिजे तेवढ्या रेल्वे गाड्याना चाळीसगाव स्थानकावर थांबा नाही, रेल्वे विभागाने रेल्वे गाड्यांना येथे थांबा दिल्यास सरकारी नोकरदार, विद्यार्थी तसेच छत्रपती संभाजी नगर, नासिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा लाभ होणार असल्याने रेल्वे गाड्याना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबा देवून प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने डी. आर. एम. भुसावळ यांना चाळीसगाव रेल्वे प्रबंधक द्वारा निवेदनाद्वारे करण्यात आली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक एक्सप्रेस डाऊन गाडी नंबर १२६२७ ही दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी तर अप १२६२८ ही गाडी दुपारी २…
साईमत पुणे प्रतिनिधी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. तर दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी 2 वाजेनंतर पाहता आला. राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी, मार्च 2023 दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा राज्यातील नऊ विभागीय मंडळांच्या मार्फत घेण्यात आली होती. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि कोकण अशा नऊ विभागात राज्यभरातून 12 लाखांवर विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण संकेतस्थळांवर उपलब्ध होतील. तसेच त्यांची प्रिंट घेता येईल. कोणत्या विभागाचा किती निकाल कोकण विभाग – सर्वाधिक 96.01…
साईमत पुणे प्रतिनिधी राज्य मंडळ दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार या कडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले होते. त्यानुसार आता राज्य मंडळाकडून गुरुवारी (२५ मे) बारावीचा निकाल दुपारी दोन वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. निकालानंतर लगेचच राज्य मंडळाकडून श्रेणीसुधार परीक्षेची अर्ज प्रक्रियाही सुरू केली आहे. त्या बाबतची माहिती राज्य मंडळाने जाहीर केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी, तसेच आपली श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची आणखी एक संधी दिली जाते. त्यानुसार जुलै-ऑगस्टमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीची श्रेणीसुधार परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ मे पासून सुरू केली जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव…
तुका म्हणे एक मरणीच सारे उत्तमची उरे कीर्ती मागे ! स्व. सौ. ललिताताई राजेंद्र बलदोटा (वय 57) एक शांत, संयमी, सहनशील, प्रेमळ व्यक्तिमत्त्व 27/4/2023 रोजी संथरा व्रतातून स्वर्गवासी झाले. पती राजेंद्र व मुलगा रोहित यांनी आधुनिक उपचारांनी प्रयत्नाची परकाष्टा करूनही यश आले नाही. मेंदूतील रक्तवाहिनीच्या गाठीनी त्यांना अकाली जावे लागले.त्या देहाने गेल्या परंतु कर्माने मरावे परी कीर्ती रूपाने उरावे या संत युक्तीने अमर झाल्या. पाटोदा जि. बिड येथील किसनलाल संचेती व माता स्व. रामकुवरबाई यांच्या पोटी 19/9/1966 जन्म घेतलेले हे कन्यारत्न जेष्ठ बंधू कांतीलाल, अभय आणि दिलीप व तसेच छोटी बहिण वंदना यांच्या बरोबर लहानाची मोठी होऊन पुणे येथे नातेवाईकांकडे…
साईमत मुंबई प्रतिनिधी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची विचारपूस करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णलयात दाखल झालेत.कालपासून मनोहर जोशी यांना बरे वाटत नव्हते. त्यामुळे हिंदुजा रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक म्हणून मनोहर जोशी यांची ओळख आहे. गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते.काल संध्याकाळी मनोहर जोशी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.त्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. मनोहर जोशी यांची…
साईमत यावल प्रतिनिधी येथील रामेश्वर कॉलनीतील रहिवासी इंदुबाई हरी सपकाळे (वय 72) यांचे आज दि.22 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि. 23 रोजी सकाळी 9 वाजता राहत्या घरुन मेहरुण स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या सुनिल व सतिष सपकाळे यांच्या आई तर अनिल व अरुण सपकाळे यांच्या काकू होत.
साईमत जळगाव प्रतिनिधी तालुक्यात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस तर्फे काँग्रेस भवनात तालुकाध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अविनाश राजू सोनवणे, विलास कैलास सोनवणे, युवराज दौलत झाल्टे सुधाकर प्रल्हाद सोनवणे संजय दत्तू पाटील, दिलीप घोलप, संदीप सुरवाडे, समाधान सोनवणे, संतोष सुरडकर, विजय रूपचंद सोनवणे, आकाश संजय मेंढे, किशोर रामकृष्ण वानखेडे, किशोर सोमा सपकाळे, सतीश माणिक इंगळे व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, नुकत्याच…