शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी रुग्णालयात; उद्धव ठाकरेंकडून विचारपूस

0
1

साईमत मुंबई प्रतिनिधी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची विचारपूस करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णलयात दाखल झालेत.कालपासून मनोहर जोशी यांना बरे वाटत नव्हते. त्यामुळे हिंदुजा रुग्णलायात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक म्हणून मनोहर जोशी यांची ओळख आहे. गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते.काल संध्याकाळी मनोहर जोशी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.त्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. मनोहर जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.
मनोहर जोशी हे मुळचे मराठवाड्याचे. ते मूळ बीडचे रहिवासी. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षणाच्या निमित्ताने मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. त्याचे  .. .. शिक्षण झाले आहे. .. झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळाली. त्याआधी त्यांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता.

त्यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९७६ ते १९७७ या काळात ते मुंबईचे महापौर होते.राज्याच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यावर ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले. १९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई सेंट्रलमधून विजयी झाल्यावर त्यांना लोकसभेत बढती मिळाली. ते लोकसभेचे सभापतीही होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here