Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी दिव्यांग बांधवांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी राज्यभर दिव्यांग कल्याण विभाग ‌‌‘दिव्यांगाच्या दारी‌‌’ हे अभियान राबविण्यात येत आहेत. हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिल्यात. हे अभियान जिल्हास्तरावर राबविण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राधिकृत केले असून जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात सदरचे अभियान राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली नुकतीच पार पडली, यावेळी ते बोलत होते. राज्य शासनाच्यावतीने स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती केली आहे. त्याअनुषंगाने राज्यातील अधिकाधिक दिव्यांग बांधवांना आपल्या तक्रारी, अडचणी मांडण्यासाठी तसेच त्यांना आवश्यक सर्व शासकीय…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीसीए व एमसीए या शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच महाविद्यालयाच्या खुल्या सभागृहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले की, आजच्या काळात आवश्यक असणारी कौशल्ये आणि नव-नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन युवक-युवतींनी रोजगारक्षम व्हावे. तसेच नवतंत्रज्ञानामुळे उद्योगात बदल झाले असे नाही तर ते कालचे उद्योग आजही त्याच स्थितीत आहे. फक्त त्याच्या यशस्वी मार्गक्रमणाची पद्धत बदलेली आहे. म्हणजेच आजच्या अपडेट तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात मोठ्याप्रमाणात बदल झाला आहे आणि…

Read More

साईमत नंदुरबार प्रतिनिधी  दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर ज्या भारताच्या सुवर्ण लेकी साक्षी मलिक, विनेश फोगाट तसेच अन्य सात कुस्तीपटू यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनात ब्रिजभूषण या खासदारावर या कुस्तीपटूंनी आरोप लैंगिक शोषणाचा केलेला आहे. ब्रिजभूषण यांनी अनेकदा या कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केलेले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ब्रिजभूषण यांना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांच्यावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी आंदोलनाद्वारे केली आहे. या विरोधात दिल्ली येथील जंतर-मंतरमध्ये चालणाऱ्या आंदोलनाला चिरडण्यासाठी भारत सरकारने साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून हे आंदोलन कसे चिरडून टाकता येईल, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यात पोलिसांनी या…

Read More

साईमत साक्री प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 75 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत साक्री आगारात सार्वजनिक रक्तदान शिबीर तसेच प्रवाशी महासंघातर्फे एस.टी.चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त प्रतिष्ठित मान्यवर व आगाराचे  प्रमुख यांनी योग्य मार्गदर्शन व शिबिराचे उद्घाटन केले. तसेच आगारातील होतकरू चालक, वाहक, यांत्रिक तसेच व्यापारी वर्ग व प्रवाशी बांधवांनीही वर्धापनदिनानिमित्त रक्तदान केले. अध्यक्षस्थानी आगार प्रमुख किशोर अहिरराव होते. यावेळी कार्यशाळा अधीक्षक श्री.शिंगाणे, स्थानक प्रमुख कुणाल घरमोडे, वाहतूक सहायक निरीक्षक  प्रशांत अहिरे, सुरेश पारख (ग्राहक पंचायत, तालुकाध्यक्ष), प्रा.बी.एम.भामरे (तालुका उपाध्यक्ष), दिलीप चोरडिया (तालुका सदस्य), विलास देसले (तालुका सचिव), भाडणे गावाचे लोकनियुक्त सरपंच अजय  सोनवणे, जोशीला पगारिया (सामाजिक कार्यकर्त्या), तात्या…

Read More

साईमत धुळे प्रतिनिधी देवपुरातील सुशीनाल्या किनारील अतिक्रमणाच्या नावाखाली वृक्षांची बेकायदेशीर सर्रासपणे कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात आला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. संबंधितांविरोधात कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. वृक्ष संवर्धनाचे काम मनपाचे असतानाही मनपाच्यावतीने वृक्षांची कत्तल केल्याने वृक्षांचे संवर्धन करणार कोण? असा संतप्त प्रश्न  यानिमित्ताने उपस्थित होत आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून सुशी नाल्या किनारील लाला सरदार नगरात नारळ, बादाम, जांभूळ यांसह 15 ते 20 डेरेदार वृक्ष अस्तित्वात होते. वृक्षांची कत्तल करू नये, अशा आशयाचे निवेदनही मनपा प्रशासनाला देण्यात…

Read More

साईमत नाशिक प्रतिनिधी इंडिगो विमान कंपनीच्या माध्यमातून नाशिकहून विमानसेवा सक्षमपणे सुरू करण्यात आली असून त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र आहे. पहिल्याच दिवशी पाच शहरांसाठीच्या सेवांचा 646 लोकांनी लाभ घेतला.इंडीगो कंपनीच्या माध्यमातून 1 जूनपासून सूरू करण्यात आलेल्या सेवांना प्रवाश्यांनी प्रतिसाद दिलेला असून अहमदाबाद, इंदौर, गोवा, हैद्राबाद व नागपूर या शहरांतून 358 प्रवाशी शहरात दाखल झाले आहेत. तर 288 प्रवाश्यांनी या शहरांसाठी विमान सेवेचा लाभ घेतलेला आहे.त्यात प्रामुख्याने नाशिकहून जाणार्‍या विमानांपैकी अहमदाबादसाठीच्या दोन विमानांतून 74 प्रवाश्यांनी प्रवास केला आहे. तर इंदौरसाठी 36 प्रवाशी, गोव्यासाठी 62 प्रवासी, हैद्राबादसाठी 65 प्रवाशी तर नागपूरसाठी 51 प्रवाश्यांनी सेवेचा लाभ घेतला. तर विविध शहरांतून नाशिकला…

Read More

साईमत पाचोरा प्रतिनिधी नगरदेवळा संस्थांचे जहागीरदार तथा येथील माणिकराजे पवार आणि विश्वासराव पवार शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. श्रीमंत सरदार बाळासाहेब कृष्णराव शिवराव पवार यांना त्यांच्या 19 व्या पुण्यतीथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय आणि प्राथमिक विद्यामंदिर, कोंडवाडा गल्ली पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 2 जून 2023 रोजी आयोजित कार्यक्रमात श्रीमंत सरदार स्व. बाळासाहेब के. एस. पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पंडित कुंभार, पर्यवेक्षक सुवर्णसिंग राजपूत, विश्वस्त प्रा.रवींद्र चव्हाण तसेच सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून…

Read More

साईमत चाळीसगाव प्रतिनिधी तालुक्यातील  मेहूणबारे येथे भऊर रस्त्यालगत एका बंद बंगल्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सुमारे 26 जुगाऱ्यांना पकडले. या कारवाईत पोलीसांनी 61 हजार रूपये रोख व 2 लाख 8हजार रूपये किंमतीच्या 8 दुचाकी असा 2 लाख 69 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला असून मेहूणबारे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती अशी की, चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांना माहिती मिळाली की, मेहुणबारे गावी भऊर गावाकडे जाणाऱ्या रोडलगत गढरी मळा येथे बंद घरात काही इसम हे स्वतःच्या फायद्यासाठी 52 पत्त्याचे कॅटवर…

Read More

साईमत रावेर प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील रावेर हे रेशन माफियांचे केंद्र बनले आहे. रावेर – बर्हाणपूर मार्गावर असलेल्या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात रेशनचे धान्य साठवून ते मध्यप्रदेशात काळ्या बाजारात विक्री केले जाते. याच संशयामुळे जिल्हाधिकारी अमान मित्तल यांनी बुधवारी छापे टाकून गोदाम सील केले. मात्र, त्यांनी तपासणी केल्याचे स्थानिक महसूल प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मात्र, गोपनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीच्या छापेमारी सारखे ‘अर्थपूर्ण’ घडामोडीतून कारवाई थांबविली जाईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रावेर हे मध्यप्रदेशापासून जवळचे शहर आहे. मध्यप्रदेशातील खरगोन आणि खंडवा येथे काही गोदाम आणि तांदूळ पॉलिस करणारे छोटे कारखाने आहेत. रावेर, यावल आणि परिसरातील गावातील रेशन दुकानांमधून रेशनचा माल…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जैन इरिगेशन (Jain Irrigation)  क्रिकेट क्लबने ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लबवर 21 धावांनी विजय मिळवत मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले. कांदिवली येथील मुंबई (Mumbai)क्रिकेट असोसिएशनच्या सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम फेरीचा सामना जैन इरिगेशन विरूद्ध ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लब यांच्यात रंगला. या सामन्यात जैन इरिगेशनने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 165 धावा केल्या. त्यात 19 वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील डावखुरा खेडाळू कौशल तांबे याने सर्वाधिक 44 धावांचे योगदान दिले. विजयासाठी 166 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लबला 20 षटकांत 9 बाद 144 धावांपर्यंत मजल मारता आली. जैन इरिगेशनचा…

Read More