जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद

0
8

साईमत जळगाव प्रतिनिधी

जैन इरिगेशन (Jain Irrigation)  क्रिकेट क्लबने ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लबवर 21 धावांनी विजय मिळवत मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले.

कांदिवली येथील मुंबई (Mumbai)क्रिकेट असोसिएशनच्या सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम फेरीचा सामना जैन इरिगेशन विरूद्ध ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लब यांच्यात रंगला. या सामन्यात जैन इरिगेशनने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 165 धावा केल्या. त्यात 19 वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील डावखुरा खेडाळू कौशल तांबे याने सर्वाधिक 44 धावांचे योगदान दिले.

विजयासाठी 166 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लबला 20 षटकांत 9 बाद 144 धावांपर्यंत मजल मारता आली. जैन इरिगेशनचा फिरकीपटू शुभम शर्मा, शशांक अत्तरदे आणि जगदीश झोपे यांनी अचूक मारा करत विजय सुकर केला.  जैन इरिगेशन क्रिकेट क्लबच्या ‘सी’ डिव्हिजनचा विजयी संघात प्रशिक्षक समद फल्ला, अमित गवांदे, यश नहार, वरूण देशपांडे, मयंक पारेख , शशांक अत्तरदे, सुवेद पारकर, सुरज शिंदे, प्रशिक्षक अनंत तांबवेकर, आदित्य राजन, प्रतिक यादव, शुभम शर्मा, जगदीश झोपे, सोहम पानवलकर, जय जैन, झैनीत सचदेव, कौशल तांबे, अर्थव पुजारी, रिषभ कारवा, वैभव चौगूले यांचा समावेश होता.
संक्षिप्त धावफलक जैन इरिगेशन सीसी : 20 षटकांत 8 बाद 165, त्यामध्ये कौशल तांबे (27 चेंडूंत 44 धावा, 2 चौकार, 2 षटकार), सुवेद पारकर (24 चेंडूत 37 धावा, 5 चौकार), जय जैन 24; संतोष चव्हाण 3/24, आदित्य राणे 3/29) विजयी विरूद्ध ऑटोमोटिव्ह सीसी : 20 षटकांत 9 बाद 144. त्यामध्ये आदित्य शेमाडकर (24 चेंडूंत 37 धावा 6 चौकार, मनेश भोगले (21 चेंडूत नाबाद 32, चौकार 1, षटकार 2, सुशांत वाजे (19 चेंडूत 27 धावा, 2 चौकार, 2 षटकार); शुभम शर्मा 3/16, जगदीश झोपे 2/22, शशांक अत्तरदे 2/24) .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here