कुस्तीपटूंना केलेली मारहाण निंदनीय, काळीमा फासणारी विविध पुरोगामी संघटनांतर्फे राष्ट्रपतींना निवेदन

0
4

साईमत नंदुरबार प्रतिनिधी 

दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर ज्या भारताच्या सुवर्ण लेकी साक्षी मलिक, विनेश फोगाट तसेच अन्य सात कुस्तीपटू यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनात ब्रिजभूषण या खासदारावर या कुस्तीपटूंनी आरोप लैंगिक शोषणाचा केलेला आहे.

ब्रिजभूषण यांनी अनेकदा या कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केलेले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ब्रिजभूषण यांना पोलिसांनी तात्काळ अटक करून त्यांच्यावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी आंदोलनाद्वारे केली आहे. या विरोधात दिल्ली येथील जंतर-मंतरमध्ये चालणाऱ्या आंदोलनाला चिरडण्यासाठी भारत सरकारने साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून हे आंदोलन कसे चिरडून टाकता येईल, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यात पोलिसांनी या कुस्तीपटूंना केलेली मारहाण ही निंदनीय आहे. माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा आशयाचे जिल्ह्यातील विविध पुरोगामी संघटनांतर्फे नुकतेच निवेदन देण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व संविधानाला मानणारे लोक या पत्राद्वारे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांना म्हटले आहे की, ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. त्या आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. या लेकींना न्याय मिळाला पाहिजे. या निदर्शनास नंदुरबार जिल्ह्यातील अनेक संघटनांचे प्रतिनिधी एकत्र जमले होते. त्यात रिपाईचे अरविंद कुवर, आदिवासी एकता परिषदेचे वनसिंग पवार, सुनील भील, सुभाष भील, माजी नायब तहसीलदार मुसा शेख रमजान तसेच  सामाजिक कार्यकर्ते गुलाब नबी झुंजार फाउंडेशनचे कृष्णा कोळी, वंचित बहुजन आघाडीचे गजेंद्र निकम, रवी मोरे, कैलास महिरे, राजू पवार, रवींद्र रामराजे, अशोक मोरे, फुले आंबेडकर स्टडी सर्कलचे चुनीलाल ब्राह्मणे, रतिलाल सामुद्रे, अनिल कुवर, माजी सभापती वनिता पटले, श्रमिक मुक्ती दलाच्या लोकशाहीवादी रंजना कान्हेरे, प्रशिकचे सुनील शिरसाठ, गोटू महिरे, दीपक मोहिते, जनार्थचे शिवाजी घोडराज विक्रम कान्हेरे, विनोद पावरा, प्रदीप निकुंभ, संतोष महिरे, विचारधारा फाउंडेशनचे तात्याजी पवार, लोणखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद माणिक, दिलीप पवार, मंदाण्याचे जितेंद्र बिरारे, विश्वास जगदेव, प्रणव बिरारे, इब्टाचे दादाभाई पिंपळे यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here