Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच 5 जून या जागतिक पर्यावरणदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा भारती रंधे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.माजी महापौर डॉ. अश्विन सोनवणे, सरिता ललित कोल्हे, नगरसेवक ॲड.दिलीप पोकळे, ॲड.अभिजीत जितेंद्र रंधे, नगरसेविका रेश्मा काळे, कुंदन काळ,े शोभा चौधरी, केशवराव म्हस्के, माजी नगरसेविका कमलताई म्हस्के, निशा पवार, शंतनु नारखेडे, हर्षल मावळे, शुभांगी बिराडे, संकेत कापसे, नारखेडे साहेब आदी उपस्थित होते. त्यावेळी शक्ती फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष मृणालिनी रंधे प्रकाश सोनवणे निरंजना तायडे लोकेश चौधरी पृथ्वीराज देशमुख संतोष भंगाळे मयूर देशमुख यांनी कार्यक्रमाचे सर्व परिश्रम घेतले..शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आलेल्या सर्व प्रमुख अतिथींना गोल्डन ट्री…

Read More

साईमत चोपडा प्रतिनिधी मंगरूळ (ता. चोपडा) येथील शेतकऱ्याने अतिक्रमणाच्या कारणkवरून गेल्या 30 दिवसांपासून उपोषण सुरू कले आहे. शुक्रवारी आंदोलनाचा 30 वा दिवस आहे. आंदोलनाला महिना उलटला तरी अद्याप शेतकऱ्यास न्याय न मिळाल्याने त्यांचे आंदोलन सुरूच आहे. प्रशासकीय पातळीवर आंदोलनाची दखल घेतली मात्र न्याय अजूनही मिळालेला नाही. प्रकाश श्रीधर पाटील असे आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या जागेत काही जणांनी अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात त्यांनी सातत्याने तक्रारी करूनही दखल न घेतली गेल्याने त्य्ाांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने अतिक्रमण काढून त्याचा खर्च बळीराम दामू पाटील यांच्याकडून वसूल करावा आणि त्या रकमेचा भरणा ग्रामपंचायतीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान…

Read More

साईमत चाळीसगाव प्रतिनिधी  नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील जातीयवादी हल्यात शहीद झालेल्या अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाचा  व लातूर मधील रेणापूर येथील मातंग बांधव गिरिधारी तपघाले यांचा निर्घृण खून करण्यात आला. मुंबई चर्चगेट येथील वसतिगृहात राहणाऱ्या हिना मेश्राम या बौद्ध तरुणीचा बलात्कार करून क्रुरपणे हत्याकांड करण्यात आले यातील गुन्हेगारांना कडक शासन झाले पाहिजे  या अशयाचे निवेदन समता सैनिक दला तर्फे तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दि 9 रोजी देण्यात आले. या प्रसंगी समता सैनिक दलाचे स्वप्निल जाधव, नितीन मारसाळे, बाबा पगारे, विशाल पगारे, दिपक बागुल, विष्णु जाधव,  राजू अहिरे, मुकेश बागुल, वहीद पठाण, शिवाजी शिंदे, विश्वजीत जाधव,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शेत, शेतकरी यांच्या जीवनात विज्ञानाच्या मदतीने उत्पन्न वाढीच्या दृष्टिने जैन इरिगेशनसह इतर कृषिपुरक कंपन्या प्रयत्न करत आहेत. मात्र सामाजीक, राजकीय, शासकीय सर्वच स्तरावर सामाजिक प्रश्न जो गांभीर्य धरत आहे तो म्हणजे शेत, शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळत नाही. ही प्रतिष्ठा फालीसारख्या उपक्रमातून मिळू पहात आहे. समाजाकडून जे घेतले त्यातून उतराई होण्याचा फाली हा उपक्रम कौतूकास्पद असल्याचे प्रतिपादन जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी केले. जैन हिल्स येथे सुरू असलेल्या फाली च्या नवव्या संमेलनाच्या समारोपाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत अतुल जैन यांनी व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी यांच्यासह ज्यांनी प्रायोजकत्व केले त्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुत्रसंचालन हर्ष…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी ”जो जेथे आहे तेथेच तो राहिलं. भाजपमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. माधवराजे शिंदे, ज्योतिरादित्य शिंदे, हर्षवर्धन पाटील, अशी भाजपमध्ये अनेक उदाहरणे दाखवता येतील. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये असले तरी अद्यापही त्यांच्या मुलीने भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. पण जो ज्या ठिकाणी आहे  तिथेच त्यांनी काम करावं. रक्षा खडसे भाजपमध्ये असतील तर त्यांनी तिथेच प्रामाणिकपणे काम करावं. एका घरात असले तरी विचार वेगवेगळे असू शकतात. अशी अनेक उदाहरणे आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी दिली. आ.एकनाथराव खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपने केलेल्या आरोपांवरही भाष्य केलं. रक्षा खडसे यांना भाजपमध्ये मोकळेपणाने काम करण्याची संधी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील  मेहरुण येथे ३६ एकर जागेवर भव्य व अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन या ठिकाणी होणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. मंत्री श्री. महाजन म्हणाले की, या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून भूसंपादनासाठीच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी, जळगाव यांच्यामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. खेळाडूंना सराव करण्यासाठी हे शासकीय क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांचे खेळाडू सराव करतील. त्यांनी केलेला सराव, अद्ययावत साधन सुविधा आणि तज्ञ मार्गदर्शक यामुळे या भागातील…

Read More

साईमत पुणे प्रतिनिधी अरबी समुद्रात खोलवर घोंघावत असलेले ‘बिपरजॉय‘ चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने जात आहे. यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला आता धोका नाही. चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनच्या गतीवर झाला होता. मात्र ज्याची आपण सगळे वाट पाहत आहे त्या मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता आठ दिवसांत मान्सूनचे कोकणात आगमन होणार आहे. मान्सून केरळात दाखल झाल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के.एस.होसलीकर यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली. आज ८ जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले. पुढील ४८ तासांत बंगालचा उपसागर आणि केरळच्या बऱ्याचशा भागात मान्सून पोहोचणार आहे.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी गावातील एका तरुणाची हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भा मंगळवारी रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन संजय सोनवणे (वय-२७) रा. मोहाडी (ता.जळगाव) याने १९ मे रात्री १० ते २० मे सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याची दुचाकी घरासमोर लावलेली असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्यानंतर त्याने परिसरात दुचाकीचा शोध घेतला. परंतु दुचाकी कुठेही मिळून आले नाही. अखेर मंगळवारी रात्री ८ वाजता तरुणाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस…

Read More

World Brain Tumor Day :  ब्रेन ट्यूमरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि या ट्यूमरने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी दरवर्षी 8 जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो. ब्रेन ट्यूमरविरूद्धच्या लढ्यात जागरूकता वाढवणे, लक्षणे, वेळेवर उपचार आणि योग्य पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे. कारण असे केल्याने तुमच्या जगण्याची शक्यता वाढू शकते. ( ब्रेन ट्यूमर म्हणजे काय? (8 June World Brain Tumor Day ) प्राथमिक लेवलला मेंदूमध्ये गाठी येतात ज्या मेंदूच्या पेशींच्या असामान्य वाढीमुळे होतात. या गाठी घातक कर्करोग असू शकतात. कर्करोग नसलेल्या ट्यूमरमुळे मेंदूच्या सामान्य ऊतींवर देखील परिणाम होऊ शकतो आणि गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. जेव्हा कर्करोगाच्या पेशी फुफ्फुस,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी इंजिनिअरींग झाल्यानंतर वडिलांनी दोन पर्याय समोर ठेवले. काळ्या आईची सेवा की नोकरी? यात शेतीला पुढील काळात भवितव्य आहे यामुळेच इंजिनिअतरिंग पेक्षा शेती करण्याचा पर्याय निवडला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, फर्टिगेशन, ऑटोमेशन, टिश्यूकल्चर या विकसीत तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यातूनच ५० एकरपासून ११० एकर शेती वाढवली. आज मध्यप्रदेशातील सर्वात समृद्ध गाव म्हणून दापोरा (जि. बुऱ्हाणपूर) आहे. फार्मर ते फॉर्च्युनर ही समृद्धी केवळ आधुनिक शेतीमुळेच साधता आली. असे अत्यंत प्रेरणादायी बोल योगेश्वर पाटील यांचे आहेत. भवरलालजी जैन यांच्या चरित्रातून आपल्याला शेती करण्याची प्रेरणा मिळाली, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. जैन हिल्सच्या आकाश मैदानावर झालेल्या या सुसंवाद कार्यक्रमात स्वप्नील प्रकाश महाजन, (वाघोदा…

Read More