साईमत जळगाव प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद येथे महामार्गावर आयशरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास एमएच 19 एए 2095 क्रमांकाच्या दुचाकीला भरधाव आयशरने उडविले. नशिराबादजवळ असलेल्या महाजन हॉटेलच्या जवळ हा अपघात घडला. या भीषण अपघातात शेनफडू बाबूराव कोळी ( रा. सामरोद, ता. जामनेर ) आणि भारती शेनफडू कोळी ( रा. सामरोद, ता. जामनेर ) या दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर सुदैवाने त्यांचा रूद्र हा तीन वर्षाचा मुलगा बचावला आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत शेनफडू कोळी हे नशिराबादमार्गे जामनेर आणि सामरोद येथे…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी या उद्दिष्टाने शालेय सुशोभीकरणाची कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली असून सदर कार्यशाळेमध्ये सुशोभीकरण म्हणजे काय ? सुशोभीकरण कशा प्रकारे करावे व त्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचा वापर करावा याविषयी मुख्या .धनश्री फालक यांनी मार्गदर्शन केले तर या सुशोधनासाठी वेळोवेळी लागणारे विविध साहित्य प्रत्यक्ष कसे तयार करावे याविषयी प्रात्यक्षिकातून उपशिक्षक योगेश भालेराव सर यांनी मार्गदर्शन केले. शालेय वर्ग स्वच्छता करणे , पताका तयार करणे , फुलांचे हार तयार करणे , वॉलपीस तयार करणे तसेच चार्ट व शैक्षणिक साहित्य तयार करण्याचे प्रशिक्षणही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनी…
साईमत धुळे प्रतिनिधी वेगवेगळ्या प्रकारणांमुळे संवेदनशील झालेल्या धुळे शहरात गावठी बंदूक आणि दोन जिवंत काडतूसे घेऊन फिरणाऱ्या युवकाच्या विरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्याकडून सुमारे २७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून तो जप्त केला आहे. मुजाहिद अहमद (३३, रा. देविका मल्ला, आदम नगर, मालेगाव) असे या युवकाचे नाव आहे. हा युवक गावठी बंदूक विक्रीच्या उद्देशाने धुळे तालुक्यातील आर्वी येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी गावालगत असलेल्या लकी स्टार हॉटेलजवळ पोलिसांनी सापळा रचून मुजाहिदला ताब्यात घेतले. अंगझडतीत सुमारे २५ हजार रुपयांची गावठी बंदूक तर दोन हजार रुपयांचे दोन जिवंत काडतूस असा २७…
साईमत चोपडा प्रतिनिधी शहरातील मास्टर कॉलनी भागात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाढदिवसाचा तलवारीने केक कापल्याप्रकरणी आठ तरुणांवर चोपडा शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांपैकी सात जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 22 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास शहरातील मास्टर कॉलनी परिसरात विना परवाना धारदार लोखंडी तलवार तसेच चाकु जवळ बाळगून सार्वजनिक ठिकाणी रोडवर वाढदिवसाचा केक कापण्याकरीता वापर करतांना आढळून आल्याने तसेच जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १) सैय्यद फैजलअली मझहरअली व २) रिजवानअली अयाजअली दोघेही रा. शेतपुरा; ३)शाकीर सैय्यद साबीरअली, ४) दानिश सय्यद साबीरअली, व ५)दानिश शेख हमीद शेख तिघेही रा. मास्टर कॉलनी;…
साध्य राज्यात बहुप्रतिक्षित तलाठी भरती प्रक्रियेला चांगलाच वेग आला असून, त्या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यानुसार राज्यात ४ हजार ६६४ जागांवर पदभरती होणार असून , यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया देखील सुरू होणार आहे. या बातमीमुळे अनेक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील तलाठी गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या भरतीसाठी सरकारने शिथिलता आणल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी लिंक खुली करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील पुण्यासह नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील भाऊंच्या उद्यानासमोर उभी दुचाकी लांबवल्याप्रकरणी शनिवार, १७ जून रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी योगेश भोजू पाटील हा तरुण वास्तव्यास आहे १० जून रोजी रात्री सव्वा सात वाजता योगेश हा भाऊंच्या उद्यानात आला होता . यादरम्यान त्याने त्याची एम.एच. १९ सीएस ०२६४ या क्रमांकाची दुचाकी भाऊंच्या उद्यानासमोर उभे केली. आठ वाजता परतल्यानंतर त्याला त्याची दुचाकी दिसून आली नाही इतरत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने सात दिवसानंतर शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास विजय खैरे हे करीत आहेत
साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा प्रशासनातर्फे दि. २७ रोजी शासन आपल्या दारी हा व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिली. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ जागेवरच मिळवून दिला जाणार आहे. त्यासाठी अडीच लाख लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून कार्यक्रमाला किमान ७० ते ७५ हजार लाभार्थी बोलावण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात आरोग्य तपासणी आणि रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात येणार आहे. जळगाव – जिल्हा प्रशासनातर्फे दि. २७ रोजी शासन आपल्या दारी हा व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार…
साईमत जळगाव प्रतिनिधी कापसाला बारा हजार रूपयांचा भाव मिळावा म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण हे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सुटले. कापसाला बारा हजार रूपयांचा किमान भाव मिळावा, तसेच शेतकर्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात याव्ो या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी दिनांक १४ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला जिल्ह्यातील मान्यवर नेत्यांनी भेटी देऊन पाठींना दर्शविला होता. उपोषणाच्या दुसर्या दिवशी जागरण आणि गोंधळाच्या अनोख्या माध्यमातून राज्य सरकारचा निषेधही करण्यात आला होता. दरम्यान, दि १६ जून रोजी अमळनेरात राष्ट्रवादीचा मोठा कार्यक्रम झाला.…
साईमत जळगाव प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस जळगाव दौऱ्यावर होते. काल जळगाव येथे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील यांच्या निवासस्थानी खासदार शरद पवार यांची काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील व पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील भेट आणि राजकीय हस्तांदोलनाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी दोन दिवसाच्या जळगाव दौऱ्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते विविध पक्षाच्या नेत्यांशी त्यांनी संवाद साधला. शुक्रवारी दुपारी ४ वाजता खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड रविंद्र पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. खा.शरद पवारांना भेटण्यासाठी याठिकाणी नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. खा.पवार…
साईमत ओझर प्रतिनिधी ओझर येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच. ए. एल. हायस्कूल म.मा. 2023- 24 या शैक्षणिक वर्षाच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यालयाचे कार्यतत्पर मुख्याध्यापक मा.आर.एल.पगारे सर यांचे शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.सुवर्णा बोडके मँडम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर सर्व चिमुकले बालगोपलांचे शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री आर.एल.पगारे सर,शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.सुवर्णा बोडके मँडम, ज्येष्ठ शिक्षक श्री एस.पी.मैन सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्याचबरोबर इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री आर.एल.पगारे सर,पर्यवेक्षिका सौ.सुवर्णा बोडके मँडम, ज्येष्ठ शिक्षक श्री एस.पी.मैन सर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन केलेले स्वागत व…