राज्यात मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणीला आजपासून प्रारंभ प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांची माहिती

0
6
According to the information of Shrirang Tambe, the state coordinator of the project, starting today, crop inspection through mobile app in the state-saimat
साईमत पुणे प्रतिनिधी
खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी १ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये ई- पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी दिली.
ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरुन सातबाऱ्यावर विविध पिकांची नोंदणी करत येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई- पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. या अॅपमध्ये आतापर्यंत १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करुन पिकांची नोंदणी केली आहे. खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here