साखरपुड्याला आले अन्‌‍ ‘नवरी’ घेऊन गेले मन्यार समाजात घडून आला आदर्श विवाह

0
3
साखरपुड्याला आले अन्‌‍ ‘नवरी’ घेऊन गेले मन्यार समाजात घडून आला आदर्श विवाह-saimat

साईमत चाळीसगाव प्रतिनिधी

लग्न कार्यासाठी ना लग्नपत्रिका, ना मानपान अशा सर्व अनावश्यक खर्चाला फाटा देत वधू-वर पक्षाला लग्नात मोठा खर्च करता येणे शक्य होते. अशातच दोन्ही परिवार, वधू-वर यांनी मान्यवरांच्या आग्रहाचा मान ठेऊन साध्या पद्धतीने लग्न उरकून घेण्याचा प्रस्ताव मान्य केला. लग्नाची पुढील तयारी सुरू झाली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच ना मानपान, ना रुसवे-फुगवे, ना हुंडा शिवाय साधेपणाने सलमान-फराहबानो यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. साखरपुड्याला आलेले मण्यार परिवार साखरपुड्याला आले अन्‌‍ ‘नवरी’ घेऊन कजगावला गेल्याचा प्रत्यय अनेकांना सुखद धक्का देणारा ठरला आहे. अशा निर्णयाचे मन्यार समाजबांधवांनी स्वागत केले आहे.

येथे हाजी हन्नान शेख गुलाब यांची मुलगी फराहबानो यांचा कजगाव येथील जाकीर अजीज मन्यार यांचे कनिष्ठ चिरंजीव शेख सलमान योंशी यांच्याशी साखरपुडा निश्चित झाला होता. यावेळी मन्यार समाज बिरादरी, समाजातील प्रमुख व्यक्ती मौलाना शफीक, हाजी अशरफ, हाजी सरफराज खान, रफिक सर, कजगावचे उपसरपंच हाजी शफी, लुकमान भाई शेख यांनी पुढाकार घेत साखरपुड्यातच लग्न लावून घेण्याची विनंती केली. या सर्वांचा मान राखून वधु-वरांच्या पालकांनी विनंती मान्य करून साखरपुड्यात लग्न उरकवून घेण्यात आले. यावेळी यावलचे मुफ्ती अ.अलीम यांनी निकाहाबद्दल आपले विचार मांडले. तसेच मौलाना हाफीज जमशेर यांनी कुराणचे पठण केले.

हा विवाह समाजातील इतरांसाठी एक आदर्श विवाह ठरला आहे. यावेळी कजगावचे उपसरपंच हाजी शफी, हाजी सरफराज, हाजी अ.गनीभाई, रसूल पहेलवान, इकबाल कुरेशी, हाजी इस्माईल, नाशिकचे फिरोज सैय्यद, नाजीम मन्यार, शफीभाई, बशीरभाई, लुकमान मण्यार, कजगावचे अरमान मन्यार, हाजी इब्राहिम हवालदार, हाजी अशरफ, रफिकभाई प्रेसवाले यांच्यासह मन्यार समाज बांधव उपस्थित होते. यावेळी हाजी गफूर पहेलवान, अलाउद्दीन शेख, फकिरा मिर्झा, असलम मिर्झा, पत्रकार गफ्फार मलिक, अजीज खाटीक, मुराद पटेल आकाश धुमाळ यांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here