साईमत मुंबई प्रतिनिधी खत विक्रेते शेतक-यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकुन फसवणुक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणा-या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतक-यांना तक्रार करण्यासाठी तात्काळ व्हाट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतक-यांपर्यंत पोहचवा असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागला दिले आहेत. कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत त्यांनी मंत्रालयात कृषी विभागाचा तब्बल अडीच तास आढावा घेतला यावेळी श्री मुंडे बोलत होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव गणेश पाटील, संचालक विस्तार व सेवा विकास…
Author: Saimat
साईमत जळगांव प्रतिनिधी विद्यार्थ्याच्या सर्वांगीन विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना कृतियुक्त व स्वानुभवातून शिक्षण देणे महत्वाचे ठरते. या पद्धतीनुसार प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे ‘हवेला वजन’ असते. हा हवेचा गुणधर्म विद्यार्थ्यांना स्वानुभवातून समजावा यासाठी त्यांनी ते विद्यार्थ्यांचा कृत्युयुक्त सहभाग घेऊन त्याना हवेलाही वजन असते हे सिद्ध करून दाखवले.यात त्यांनी सारख्या आकाराचे दोन फुगे घेतले, एक स्ट्रॉ ,तसेच एक बारीक दोरा घेतला.सर्वप्रथम त्यांनी स्ट्रॉ घेतला. स्ट्रॉ ला मध्यभागी दोरा बांधला व असा टांगला की तो बरोबर आडव्या रेषेत राहील.स्ट्रॉच्या दोन टोकांना दोन सारख्या आकारांचे रबरी फुगे बांधले. स्ट्रॉ आडव्या रेषेत राहील. आता त्यांतील एक फुगा काढला आणि तो…
साईमत पाचोरा प्रतिनिधी आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात किरीट सोमय्या यांचा प्रतिकात्मक पुतळा (अग्निदाग देण्यात आला) दहन करण्यात आला व महिला कार्यकर्त्यांकडून त्यांच्या फोटोला जोडे मारले गेले, किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला या व्हिडिओमध्ये 100% सत्यता असणार या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी शिवसेना (उ.बा.ठा) यांच्याकडून करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाच्या विरोधात तहसील ऑफिस मध्ये माननीय तहसीलदार साहेब व पाचोरा पोलीस स्टेशनचे पीआय यांच्याकडे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी दीपक राजपूत, उद्धव मराठे, रमेश बाफना, भरत खंडेलवाल, नरेन्द्रसिंग सुर्यवंशी, शरद पाटील, एडवोकेट दीपक पाटील, अनिल…
साईमत बोदवड प्रतिनिधी लुक्यातील सुरवाडे, बोरगाव येथील शेतकऱ्यांनी खरेदी केलेले सरदार कंपनीच्या खतांमुळे कपाशी पिकांवर दुष्परिणाम झाला आहे. कपाशीचे पाने उलटे पडून त्यांच्यावर पांढऱ्या रेषा उमटून रोपांची वाढ खुंटली आहे. या शेतकऱ्यांनी जय अंबिका कृषी केंद्र बोदवड येथून हे खत खरेदी केलेले आहे. या दुकानधारकांनी त्यांच्या गोडाऊन मधील सरदार कंपनी च्या नावाचे खतांच्या बॅगा सुरावाडा व बोरगाव व इतर गावांमध्ये खताचे ब्याग विक्रीसाठी उपलब्द करून दिले होते . शेतकऱ्यांनी या गोडाऊन मधुन रासायनिक खताच्या बॅगा वापरल्याने सुरवाडाव व बोरगाव येथील शेतकऱ्यांच्या कपाशीचे भारी नुकसान झाले. त्यांनी खते टाकल्याच्या काही चार ते पाच दिवसांमध्ये त्यांच्या कपाशींचे पाने उलटे झाले आणि वाढ…
भारत (India) आणि फ्रान्स (France) हे अनेक शतके परस्परांचे मित्र राहिले आहेत. भारतावरचा इंग्रजांचा डोळा आणि पुढे त्यांनी काबीज केलेली भारताची सत्ता यांचाही या मैत्रीला एक सबळ कोन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही सुरतेत फ्रेंच वखारीला हात लावला नव्हता. फ्रेंचांनी राजापूरची वखारही महाराजांच्या परवानगीने चालवली आणि बदल्यात मराठ्यांच्या सैन्याला उत्तम दारुगोळा पुरविला. पुढे इब्राहीम खान गारदी यांच्या नाविक दलाला प्रशिक्षित करेपर्यंत ही मैत्री वाढली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीत सर्वाधिक लक्षणीय करार लष्करी सहकार्याचे झाले आहेत.भारत लढाऊ विमाने आणि अत्याधुनिक पाणबुड्या तर घेणार आहेच पण हिंदुस्थान एरोनॉटिक्स विकसित करीत असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टरला फ्रेंच बनावटीची इंजिने असणार आहेत.आजवर…
मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. नव्या कार्याची सुरुवात करु शकता. खर्चात वाढ होईल. भावंडांसोबत मतभेद होऊ शकतात. आजचा शुभ रंग – केशरी. वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: आत्मविश्वासात कमी जाणवेल. संयम ठेवा. हाती घेतलेले काम वेळेवर पूर्ण कराल. उत्पन्नात वाढ होईल. संपत्तीतून चांगला नफा प्राप्त होईल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. आजचा शुभ रंग – पांढरा. मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: वाद-विवाद टाळा. नव्या ओळखी होतील. कला क्षेत्रात रुची वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष देणे गरजेचे आहे. आजचा शुभ रंग – नारंगी. कर्क…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या (CTPC) वतीने गेल्या सहा महिन्यात नामांकित ४२ उद्योग समूहांना परिसर मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते त्यात ९५ विद्यार्थ्यांना या उद्योग समूहांमध्ये रोजगार प्राप्त झाला आहे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेलला बळकटी दिली जात असून विद्यापीठात कॅम्पस् आणि विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीव्दारे रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील व राज्याबाहेरील नामांकित उद्योग समूहांना विद्यापीठात परिसर मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाते. जानेवारी ते जून २०२३ या सहा महिन्यात ४२ उद्योग समूहांना परिसर मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते.…
साईमत जळगाव प्रतिनिधी पाडळसे (ता. यावल) येथे बेकायदेशीर सुरू असलेले अवैध दारू अड्डे कायमस्वरूपी बंद करावते, या मागणीसाठी सोमवारी दुपारी १ वाजता जनक्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. याबाबत जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील यावल तालुक्यात असलेल्या पाडळसे गावात बेकायदेशीर अवैध दारू अड्डे बेसुमारपणे चालू आहेत. या दारू अड्ड्यांमुळे गरीब कष्टकरी महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. वारंवार फैजपूर पोलिस स्टेशनला दारू अड्डे बंद करण्याबाबत तक्रारी केलेल्या आहेत. तरीसुद्धा सुमारे १५ ते २० दारूअड्डे सर्रासपणे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. गेल्या ८ दिवसांपूर्वी २७ वर्षांचा तुषार तावड़े नावाचा युवक विषारी दारू सेवन केल्याने मृत्यू झाला. याबाबत…
साईमत अमळनेर प्रतिनिधी येथील विजय नाना पाटील आणि ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पी.एम. कोळी, शिक्षक शिवाजी पाटील, विद्यार्थ्यांचा वाढदिवस संयुक्तपणे सगळा स्टाफ, विद्यार्थ्यांसमोर साजरा करण्यात आला. निवासी शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक म्हणून शिक्षक भूमिका पार पाडतात. तसेच १ जुलैचा योग साधून प्राचार्य पी.एम.कोळी, विज्ञान शिक्षक शिवाजी पाटील आणि सहावीचा विद्यार्थी निशांत पारधी यांचा वाढदिवस संयुक्तपणे साजरा करण्यात आला. अशी वेगळी संकल्पना ज्येष्ठ शिक्षक डी.डी.घोडेस्वार, ज्येष्ठ शिक्षक अनिल पाटील, सांस्कृतिक प्रमुख शरद पाटील, सदस्य संजय पाटील, सदस्य व्ही.डी.पाटील यांच्या माध्यमातून राबविण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, ज्येष्ठ व्ही.जी.बोरसे, बी.डी.पाटील, सर्व शिक्षक वृंद, शिक्षिका वृंद,…
साईमत अमळनेर प्रतिनिधी येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू. कॉलेज येथे मराठा सेवा संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष तथा जळगाव ग.स.सोसायटीचे स्विकृत सदस्य प्रा.राम पवार यांनी सदिच्छा भेट देऊन शालेय परिसर आणि शाळेच्या प्रगतीची स्तुती केली. आर्मी स्कूलची प्रगती पाहून संस्थाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला. त्याचबरोबर संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील यांच्या नवीन नेतृत्वाबद्दलही गौरवोद्गार काढले. त्याच्यासमवेत जळगाव महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा लीना पवार उपस्थित होत्या. याप्रसंगी संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा.सुनील गरुड, प्रशासकीय अधिकारी प्रा.श्याम पवार, प्राचार्य पी.एम.कोळी यांनी दोघांचा यथोचित स्वागत करुन सत्कार केला. प्रा.सुनील गरुड यांनी एस.एन.डी.च्या विद्यार्थिनींसाठी…