प्रा.राम पवार यांची आर्मी स्कूलला सदिच्छा भेट

0
1
प्रा.राम पवार यांची आर्मी स्कूलला सदिच्छा भेट-saimat

साईमत अमळनेर प्रतिनिधी

येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्यू. कॉलेज येथे मराठा सेवा संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष तथा जळगाव ग.स.सोसायटीचे स्विकृत सदस्य प्रा.राम पवार यांनी सदिच्छा भेट देऊन शालेय परिसर आणि शाळेच्या प्रगतीची स्तुती केली. आर्मी स्कूलची प्रगती पाहून संस्थाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय पाटील यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला. त्याचबरोबर संस्थेचे कार्याध्यक्ष अनिकेत पाटील यांच्या नवीन नेतृत्वाबद्दलही गौरवोद्गार काढले.

त्याच्यासमवेत जळगाव महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा लीना पवार उपस्थित होत्या. याप्रसंगी संस्थेचे मानद शिक्षण संचालक प्रा.सुनील गरुड, प्रशासकीय अधिकारी प्रा.श्याम पवार, प्राचार्य पी.एम.कोळी यांनी दोघांचा यथोचित स्वागत करुन सत्कार केला.
प्रा.सुनील गरुड यांनी एस.एन.डी.च्या विद्यार्थिनींसाठी अद्ययावत एमपीएससीच्या पुस्तकांचा संच उपप्रचार्य प्रा.श्याम पवार यांना सुपूर्द केला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक डी.डी.घोडेस्वार, मिलिंद बोरसे, रामराव आर्मी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद पाटील तर अनिल पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here