बोदवड तालुक्यामध्ये निकृष्ट खतांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान

0
4
बोदवड तालुक्यामध्ये निकृष्ट खतांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान

साईमत बोदवड प्रतिनिधी

लुक्यातील सुरवाडे, बोरगाव येथील शेतकऱ्यांनी खरेदी केलेले सरदार कंपनीच्या खतांमुळे कपाशी पिकांवर दुष्परिणाम झाला आहे. कपाशीचे पाने उलटे पडून त्यांच्यावर पांढऱ्या रेषा उमटून रोपांची वाढ खुंटली आहे. या शेतकऱ्यांनी जय अंबिका कृषी केंद्र बोदवड येथून हे खत खरेदी केलेले आहे. या दुकानधारकांनी त्यांच्या गोडाऊन मधील सरदार कंपनी च्या नावाचे खतांच्या बॅगा सुरावाडा व बोरगाव व इतर गावांमध्ये खताचे ब्याग विक्रीसाठी उपलब्द करून दिले होते . शेतकऱ्यांनी या गोडाऊन मधुन रासायनिक खताच्या बॅगा वापरल्याने सुरवाडाव व बोरगाव येथील शेतकऱ्यांच्या कपाशीचे भारी नुकसान झाले.

त्यांनी खते टाकल्याच्या काही चार ते पाच दिवसांमध्ये त्यांच्या कपाशींचे पाने उलटे झाले आणि वाढ थांबली त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना आता ते कपाशीचे पिक पुन्हा सुधारेल की नाही या बद्दल शंका आहे. इतका खर्च व मेहनत करून पेरलेल्या पिकांची ही अवस्था सांगतांना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आणि या मुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानी मुळे पिक कर्ज व उसनवारी कशी फेडायची या विचाराने शेतकरी मानसिक धक्क्यात आहेत.आता या सरदार ब्रॅण्ड खतांमुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई जर मिळाली नाही तर शेतकरी फार मोठ्या अडचणीत येतील. राज्य शासनाच्या कृषी विभागाने तसेच पंचायसमितीचे कृषी विभागाने यात तात्काळ लक्ष घालून संबंधित खतांच्या वितरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here